Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 Sep 2024, 15:40 वाजता

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CIDकडे

 

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे एन्काऊटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे...सीआयडी अधिक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार...सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार...अक्षय शिंदेबाबत दोन स्तरावर चौकशी हईल- सीआयडी चौकशी व न्यायालयीन चौकशी

24 Sep 2024, 15:13 वाजता

'अक्षय शिंदेला संपवून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न', सुषमा अंधारेंचा आरोप

 

Sushma Andhare : बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. अक्षय शिंदे गतीमंद होता, असं बदलापूर पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग त्याने चपळाईनं गोळीबार कसा केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे, असंही अंधारेंनी म्हटलं आहे. 

24 Sep 2024, 14:47 वाजता

Sanjay Shinde Vs Naresh Mhaske : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसबोत जामिनावर सुटलेले निवृत्त एन्कऊंटर स्पेशालिस्ट फिरतात त्यांची या प्रकरणात भूमिका काय? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. असे अनेक पोलीस जखमी झालेले बघितलेत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तर राऊतांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा 

24 Sep 2024, 14:14 वाजता

शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली

 

Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी  महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.. राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया काढण्यात आलीय... किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर संतप्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारनं शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

24 Sep 2024, 14:02 वाजता

सरकारला कुणाला वाचवायचं आहे ? - सुषमा अंधारे

 

Sushma Andhare : बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. अक्षय शिंदे गतीमंद होता, असं बदलापूर पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग त्याने चपळाईनं गोळीबार कसा केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे, असंही अंधारेंनी म्हटलं आहे. 

24 Sep 2024, 13:21 वाजता

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला का? - संजय शिरसाट

 

Sanjay Shirsat On Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय.. आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर झालं का? पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या का? याची चौकशी व्हावी असं संजय शिरसाट म्हणालेत.. विरोधकांनी याचं राजकारण करू नये असंही संजय शिरसाट म्हणालेत...

24 Sep 2024, 13:17 वाजता

आरोपीचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा - प्रकाश आंबेडकर

 

Prakash Ambedkar : शासनानं आरोपीचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलीय. तसंच आरोपीला गोळी कुठे लागली होती, याची खरी माहिती जनतेसमोर आणा, असंही आंबेडकरांनी म्हटलंय. अक्षय शिंदेगोळीबाराप्रकरणी आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिलीये. 

24 Sep 2024, 12:26 वाजता

राज्यात पोलीस सुरक्षित आहेत का? - सुप्रिया सुळे

 

Supriya Sule : आरोपीचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. पोलिसांची बंदुक घेऊन आरोपीने पोलिसांना जखमी केलं, यावरून मला पोलिसांची काळजी वाटते, अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिलीये. तसंच महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित आहेत का? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

24 Sep 2024, 12:17 वाजता

आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 

Aaditya Thackeray Tweet : बदलापूर एन्काऊंटरच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. बदलापूर शाळेचं विश्वस्त कुठं आहे? सरकार त्यांना का पाठिशी घालतंय?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी एक्स या सोशल मीडियावरून केलाय. शाळेचं विश्वस्त हे भाजपशी संबंधीत असल्याचा आरोपही आदित्य यांनी केलाय.

24 Sep 2024, 12:05 वाजता

आशिष शेलारांना प्रिया दत्त यांचं आव्हान?

 

Priya Dutt : मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतलीय. भाजपचे आशिष शेलार वांद्रे प्रश्चिमचे विद्यमान आमदार आहेत. प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास शेलार विरुद्ध प्रिया दत्त सामना रंगण्याची शक्यता आहे.