Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 Sep 2024, 11:05 वाजता

पंढरपूरमध्ये धनगर समाजाची आज बैठक

 

Pandharpur : पंढरपुरात आज धनगर समाजाची बैठक पार पडणारेय. आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे.  धनगर आणि धनगड हे एकच आहेत. यासंदर्भात 7 दिवसांमध्ये अध्यादेश काढू, असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. तर खिलारे कुटुंबाचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार होतं.  होते. ही मुदत संपलीय. सरकारनं याबाबत निर्णय घेतला नाही. यापार्श्वभूमीवर आज बैठक होणारेय. या बैठकीतून पुढील भूमिका स्पष्ट केली जाणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 11:02 वाजता

एन्काऊंटर प्रकरणातील व्हॅनची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

 

Akshay Shinde : ज्या पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला होता. त्या व्हॅनचा तपासणी केली जातेय. फॉरेन्सिक टीमकडून ही तपासणी सुरुये. पोलिसांनी स्वंरक्षणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केलाय. ही व्हॅन सध्या ठाण्यामध्ये आहे. तिची तपासणी केली जातेय. 

24 Sep 2024, 10:57 वाजता

बदलापूर प्रकरणातील पोलिसांना बक्षीस जाहीर

 

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील पोलिसांना शर्मिला ठाकरेंनी 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय, अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधवांनी केलीय. दोन पोलिसांना प्रत्येकी 51 हजारांचं बक्षीस दिलं जाणारेय. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज ठाकरेदेखील या जखमी पोलिसांची भेट घेणार असल्याची माहितीही जाधवांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

24 Sep 2024, 09:18 वाजता

सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर?

 

Siddhivinayak Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याचा आऱोप झाल्यानंतर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादावरही प्रश्न उपस्थित होताय. कारण मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादात उंदराचे पिल्ले सापडल्याचा आऱोप होतोय.. तसा व्हिडीओ सध्या व्हायरलं होतोय... त्यामुळे सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्चिचिन्ह निर्माण झालंय.. मात्र दुसरीकडे सिद्धीविनायक प्रशासनानं आरोप फेटाळलेत. मंदिरातील प्रसाद शुद्ध असल्याचा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतोय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 08:45 वाजता

नरहरी झिरवाळांचा आंदोलनाचा इशारा

 

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांनी आता थेट सरकारलाच इशारा दिलाया. धनगर समाजासाठी एका दिवसांत दोन बैठका घेतल्या जातात मात्र आदिवासी समाजाला अंधारात ठेउन सरकार निर्णय घेतंय, असा आरोप झिरवाळांनी सरकारवर केलाय. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये हे आम्हीच का समजून घ्यायचं? असा सवालही झिरवाळांनी केलाय. आता परवानगी मागू. परवानगी दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान, आदिवासी समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत झिरवाळांनी ही आक्रमक भूमिका घेतली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 08:39 वाजता

डॉ. अजित रानडेंना हायकोर्टाकडून दिलासा कायम

 

Pune Dr. Ajit Ranade : पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडेंना हायकोर्टानं दिलासा कायम ठेवलाय. रानडेंना कुलगुरू पदावरून न हटविण्याचे आणि त्यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. या प्रकरणी आता 25 सप्टेंबरला सुनावणी होणारेय. दरम्यान, कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रानडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर ही सुनावणी होणारेय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 08:16 वाजता

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

 

Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे... कोकण, विदर्भ, मराठवाड्यात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे.. बंगालच्या उपसागरात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालीय.. त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 08:10 वाजता

मुंबई विद्यापीठ सिनेटसाठी आज मतदान

 

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी आज मतदान पार पडणार आहे.. सिनेटसाठी 28 उमेदवार रिंगणात असणार असल्याची माहिती आहे.. तर 27 सप्टेंबरला निकाल लागणार आहे.. ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत होणार आहे... युवासेना आणि अभाविपाच्या प्रत्येकी 10 उमेदवारांमध्ये सामना रंगणार असल्याची माहिती आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Sep 2024, 08:01 वाजता

महायुतीच्या जागावाटपाचा आज अंतिम निर्णय?

 

Mahayuti Meeting : अमित शाहांच्या संभाजीनगर दौ-याच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये दोन बैठका होणार आहे. पहिली बैठक ही भाजपच्या मतदारसंघ निहाय आढाव्याची असणार आहे. तर त्यानंतर दुसरी बैठक ही महायुतीची होणार आहे. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या बैठकीला हजर असणार आहेत. संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ,संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. आणि रमा हॉटेलमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताय.

 

24 Sep 2024, 07:57 वाजता

अमित शाह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

 

Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. अमित शाहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्रात असणार आहेत. यामध्ये आज ते नागपूर, संभाजीनगरमध्ये बैठका घेतील. तर उद्या नाशिक, कोल्हापूरमध्ये त्यांच्या बैठका असणार आहेत. लोकसभेत विदर्भातून कमी जागा मिळाल्या असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कान मंत्र तर काहींची कान उघडणी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.  सुरेश भट सभागृहात होणा-या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांची पक्षसंघटनात्मक बैठक होणार आहे.1500 पदाधिकारी या बैठकीत असतील अशी माहिती आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -