Maharashtra Breaking News LIVE: 'शपथविधी ठरला, मुख्यमंत्री कोण होणार?', आदित्य ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: 'शपथविधी ठरला, मुख्यमंत्री कोण होणार?', आदित्य ठाकरेंचा सवाल

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

30 Nov 2024, 22:19 वाजता

एका पक्षाच्या नेत्याची ट्विटद्वारे घोषणा - आदित्य 

शपथविधी सोहळ्याच्या घोषणेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केलीय. शपथविधीची तारीख ठरली, मात्र मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केली. 

 

30 Nov 2024, 19:32 वाजता

दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होणार - अजित पवार 

राज्यातील महायुती सरकारच्या नव्या इनिंगचा शपथविधी अखेर ठरला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर तारीख आणि जागेची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत झी २४ तासशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 

बातमी सविस्तर वाचा - मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

 

30 Nov 2024, 18:31 वाजता

नाना पटोलेंवर आरोप करणं बंटी शेळकेंना भोवलं, काँग्रेसकडून नोटीस

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप करणं काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंना चांगलंच भोवलंयय. बंटी शेळकेंना काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन विभागाकडून नोटीस बजावण्यात आलीये. पटोलेंवरील आरोपाबाबत दोन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश बंटी शेळकेंना देण्यात आलेत. नाना पटोले हे RSS चे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळकेंनी केला होता. त्यानंतर त्यांना आता काँग्रेस पक्षाकडून नोटीस देण्यात आलीये.

30 Nov 2024, 18:04 वाजता

सत्तास्थापनेच्या तारखांवरुन दिल्लीत महत्त्वाची बैठक

बातमी देशाच्या राजधानीतून, राज्यातील घडामोडींबाबत... भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भेट घेतली. जे पी नड्डा यांच्या घरी विनोद तावडे दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमाराला दाखल झाले. तिथे दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर तावडे तिथून निघाले. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना आता चांगलाच वेग आलाय. 

 

30 Nov 2024, 17:27 वाजता

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव उपोषण सोडलं

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या 3 दिवसीय आत्मक्लेश आंदोलनाचा समारोप करण्यात आलंय. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलं आहे. यावेळी ते म्हणाले की, EVM गैरप्रकारविरोधातील लढा सुरुच ठेवला जाणार आहे. 

 

30 Nov 2024, 17:24 वाजता

मुख्याध्यापकाकडून 14 अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांच्याच शाळेतील  14 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केलाचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध गुन्हा ही दाखल केलाय. तर या मुख्याध्यापकाचे निलंबन देखील करण्यात आले आहे. 

30 Nov 2024, 17:04 वाजता

'5 डिसेंबरलाच होणार शपथविधी', बावनवकुळेंचा मोठी माहिती

नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीये.. भाजप आमदारांची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप आमदारांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.. यावेळी 5 डिसेंबरला होणा-या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या  सूचना त्यांनी दिल्या.. तसंच शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यात जल्लोष करा असंही त्यांनी सांगीतलं.. प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थीत राहतील.. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पास असणा-यांनाच आझात मैदानात प्रवेश दिला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं... 

30 Nov 2024, 17:02 वाजता

राजन साळवींची ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी

माजी आमदार राजन साळवींनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी केलीय. विधानसभा निकालावर आक्षेप घेत त्यांनी निवडणूक अधिका-यांना निवेदन दिलंय. राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक-2 आणि चाफवली मतदान केंद्र क्रमांक 200 तर तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची साळवींची मागणी आहे. यासाठी 94 हजार 400 रुपये शुल्कही भरलंय.

30 Nov 2024, 17:00 वाजता

निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार 

निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. पैशांचा येवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणालेत. जनतेनं आता याबाबत उठाव कऱण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणालेत. तसेच शेवटच्या दोन तासात वाढलेलं मतदान धक्कादायक असल्याचं शरद पवार म्हणालते. पुण्यातील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 

30 Nov 2024, 16:58 वाजता

बाबा आढावांनी आपलं उपोषण अखेर सोडलं

ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत बाबा आढावांनी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ईव्हीएमविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू होतं..  उद्धव ठाकरेंच्या हातून पाणी घेऊन बाबा आढाव यांनी आपलं उपोषण सोडलंय.. त्यांच्या आंदोलनाला आज शरद पवारांसह अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी भेट दिलीये.. बाबा आढावांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आजचा शेवटचा दिवस होता.. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी त्यांच्या