Suryakumar Yadav Dance : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा मैदानात चौकार षटकारांची आतिषबाजी करून संघासाठी मोलाचं योगदान देण्यासह, प्रेक्षकांचं मनोरंजनही करत असतो. सध्या सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पत्नी देविशा शेट्टी सह लग्नात भन्नाट डान्स करताना दिसत आहे. सूर्यकुमार यादवची बहीण डिनल यादव हिचं लग्न कृष्णा मोहन याच्याशी झालं आहे. बहिणीच्या लग्नात सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यासह सूर्या सर्व कार्यक्रम एन्जॉय करताना देखील दिसला.
Cricketer surya_14kumar dacing for Angaron sooseki song alluarjun Pushpa2TheRule pic.twitter.com/xczCzp25n9
— AlluBabloo Mithun (allubabloo18) November 28, 2024
सूर्यकुमार यादव याचा जन्म 14 सप्टेंबर 1990 रोजी मुंबईत झाला. सूर्यकुमार यांच्या कुटुंबाचा खेळाशी विशेष संबंध नव्हता, पण सूर्याला खेळाची नितांत आवड होती. लहानपणापासूनच त्याला क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळण्याची आवड होती. सूर्यकुमार यादवला वयाच्या 31 व्या वर्षी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी तो फक्त देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायचा. सूर्यकुमार यादवला त्याच्या सूपला शॉटमुळे मिस्टर 360 सुद्धा म्हंटले जाते. सूर्यकुमार यादवने वनडे क्रिकेटमध्ये 37 सामने खेळले असून यात 773 धावा केल्या. तर 78 टी 20 सामन्यात त्यांनी 2570 धावा केल्या आहेत. सूर्याच्या नावावर 4 शतक आहेत. तर सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 150सामने खेळले असून यात 3594 धावा केल्या आहेत यात 2 शतकांचा सुद्धा समावेश आहे.