Maharashtra Breaking News LIVE : निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Maharashtra Breaking News LIVE : निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

28 Sep 2024, 10:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरून हटवा'

निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसनं केलीये. विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणा-या अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलीये.

 

28 Sep 2024, 09:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

एक मोठी राजकीय बातमी सोलापुरातून...सोलापुरात अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र, पक्षातील वरिष्ठांकडून काही दिवस थांबण्याच्या सल्ला देण्यात आल्याची माहिती उमेश पाटलांनी दिलीय. राजन पाटलांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आलीय. तसेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्यानं उमेश पाटील आक्रमक झालेत. त्यांनी थेट राजीनामा देण्याची तयार दर्शवलीय. मोहळमधून पराभव झाल्यानंतर पक्षाचे डोळे उघडतील, अशी प्रतिक्रियाही उमेश पाटलांनी दिलीय.

28 Sep 2024, 09:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : नाशिकमध्ये आज भव्य स्मारकाचं उदघाटन

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  थेट रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकमध्ये  दाखल होणारेत.  भुजबळ पुणे दौऱ्यावर असतांना  घशाचा संसर्ग झाल्यानं त्यांना विशेष विमानानं मुंबईत आणून बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आलं. भुजबळ यांची तब्येत स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय..मात्र तरीही ते नाशिकला जाणार आहेत. नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका इथं भुजबळ यांच्या संकल्पनेतुन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय, त्याचं उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारेय, या कार्यक्रमासाठी भुजबळ हे रुग्णलयात दाखल असतांनाही येणार आहेत, ते रुग्णालयातून थेट मुंबई विमानतळावर येतील, तेथून विशेष विमानाने नाशिकला येतील आणि कार्यक्रम संपताच पुन्हा मुंबईला जाऊन रुग्णालयात दाखल होतील, डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही भुजबळ नाशिकमध्ये जाणार आहेत.

28 Sep 2024, 09:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : . सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली...

सिनेटच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा अविर्भावातही राहू नये, असा चिमटा उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना काढलाय.

 

28 Sep 2024, 09:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौ-यावर आहेत.. नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे.. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत तीन तास मुख्यमंत्री नाशिकमध्ये असणार आहेत. त्यांच्या हस्ते मराठा धनगर विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, स्मृती उद्यानाचे लोकार्पण , महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण तसंच रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.. 

 

28 Sep 2024, 09:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना धोका - रोहित पवार

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना धोका आहे. त्यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा द्या, असं उपरोधिक विधान आमदार रोहित पवारांनी केलंय. एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा घालते. गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल? असा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. 

 

28 Sep 2024, 08:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'राजीव गांधींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची ऑफर'

प्रकाश आंबेडकरांनी चक्क मंत्रिपद नाकारलं होतं.. याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच टू द पॉईंट मुलाखतीमध्ये केलाय.. 1984 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर होती.. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी व्ही.पी.सिंग यांना शब्द दिला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजीव गांधींची ऑफर नाकारली होती. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्रिपदाची ऑफर होती मात्र तीही नाकारली असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी या मुलाखतीत केलाय..

 

28 Sep 2024, 08:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत'

उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलीय. मात्र आम्ही कोणाकडे जाणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. 

28 Sep 2024, 08:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : भुजबळ-मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय.. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

 

28 Sep 2024, 08:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर...'

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे.. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय..