Maharashtra Breaking News LIVE : घराणेशाही पक्षांची स्वत:ची विचारधारणा नसते - मुख्यमंत्री

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Maharashtra Breaking News LIVE : घराणेशाही पक्षांची स्वत:ची विचारधारणा नसते - मुख्यमंत्री

28 Sep 2024, 08:41 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'राजीव गांधींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची ऑफर'

प्रकाश आंबेडकरांनी चक्क मंत्रिपद नाकारलं होतं.. याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच टू द पॉईंट मुलाखतीमध्ये केलाय.. 1984 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर होती.. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी व्ही.पी.सिंग यांना शब्द दिला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजीव गांधींची ऑफर नाकारली होती. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्रिपदाची ऑफर होती मात्र तीही नाकारली असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी या मुलाखतीत केलाय..

 

28 Sep 2024, 08:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत'

उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलीय. मात्र आम्ही कोणाकडे जाणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. 

28 Sep 2024, 08:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : भुजबळ-मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय.. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

 

28 Sep 2024, 08:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर...'

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे.. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. 

 

28 Sep 2024, 08:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : जरांगेंसोबत आघाडी करु शकत नाही-आंबेडकर

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करु शकत नाही असं वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलंय.. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. आरक्षणवादी असलो तरी जरांगेंच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच जरांगेही आमच्यासोबत येऊ शकत नाही कारण त्यांना तडजोड करावी लागेल असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय..

 

28 Sep 2024, 08:36 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 'वंचितला सोबत न घेतल्यानं काँग्रेसचा पंतप्रधान नाही'

काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय.. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं.. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असंही आंबेडकर म्हणालते. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणालेत..