Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28th December 2024: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
28 Dec 2024, 20:52 वाजता
कल्याण अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण प्रकरणात ३० दिवसांत चार्जशीट फाईल करणार. तसेच दोषींना ४ महिन्यात कठोर शिक्षा सुनावणार पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.
28 Dec 2024, 18:38 वाजता
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा आज केली.
1) प्रदेश संघटनपर्व समिती चे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून कऱण्यात आली.
2) प्रदेश अनुशासन समिती च्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत छ.संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह व पुणे येथील योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नियुक्त केले.
3) प्रदेश सक्रिय सदस्यता अभियाना ची घोषणा केली. अभियानाचे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
28 Dec 2024, 16:58 वाजता
बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड पोलिस अधीक्षकांना आदेश, तातडीने फेरआढावा घ्या असेही त्यांनी आदेशता म्हंटले आहे.
28 Dec 2024, 16:45 वाजता
नवं वर्षाचं स्वागत, नवी मुंबई पोलिसांची सर्वत्र राहणार करडी नजर
नवं वर्षाचं स्वागत करताना सावधान कारण नवी मुंबई पोलिसांची करडी नजर सर्व नागरिकांवर राहणार आहे. सर्वत्र पोलीस पेट्रोलिंग आणि चौकाचौकात नाकाबंदी करुन मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच बार, पब आणि फार्महाऊस वर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील सिसीटीव्हीच्या माध्यमातून कुठेही अनुचित प्रकार घडू नये यावर देखील पोलीसांचे विशेष लक्ष राहणार असून अमली पदार्थांचे सेवन केल्यास पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी नवं वर्षाचं स्वागत उत्साहात मात्र सुरक्षित पद्धतीने करावे असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलेय.
28 Dec 2024, 15:22 वाजता
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क नाही- खासदार बजरंग सोनवणे
9 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. खंडणीखोरचां मास्टर माईंड कोण आहे? धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क नाही, अशी टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.दिवसाढवळ्या खून करतात आणि त्यांच्यामागे प्रशासन पोलीस आहेत. मंत्री झालात तुमची पिलावळ आवरा असे बजरंग सोनावणे यावेळी मुंडे यांना उद्देशून म्हणाले.
28 Dec 2024, 15:13 वाजता
धनंजय मुंडेंना अजित पवारांनी हाकलून द्यायला पाहिजे- नरेंद्र पाटील
वाल्मिक कराडला अटक झालीच पाहीजे. धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी हाकलून द्यायला पाहिजे होते. मुंडेला मंत्री पद द्यायला नको होतं. आमचा देशमुख अठरा पगड जातीचा तो मराठा नाही.
28 Dec 2024, 14:26 वाजता
करूळ घाट 15 जानेवारीला सुरू होणार- नितेश राणे यांचे संकेत
मागील वर्षभर बंद असलेला तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असलेला करूळ घाट 15 जानेवारी पर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत. मंत्री नितेश राणे यांनी आज करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी घाटाचे 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाले असून 10 जानेवारी रोजी पुन्हा एकदा या घाटाची पाहणी करून मगच 15 जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असे सांगितले. त्यासोबत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लागणारे अतिरिक्त चार्ज कमी करावे यासाठी आपण कारखानदारांशी बोलणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
28 Dec 2024, 14:01 वाजता
प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
प्रकाश आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात परभणीच्या घटनेवर चर्चा झाली. लाठी चार्जचे आदेश देणाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच ज्या घरांची तोडफोड झालीय त्यांचा खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
28 Dec 2024, 13:19 वाजता
कल्याणमधील पीडित कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कल्याणमधील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. आरोपीला कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असे वचन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना दिले आहे. पीडित कुटुंबियांसोबत स्थानिक आमदार सुलभा गायकवाड देखील उपस्थित होत्या.
28 Dec 2024, 13:08 वाजता
पालेभाज्या झाल्या स्वस्त
हिवाळा सुरू झाल्याने पालेभाजी ची आवाक वाढली आहे , विशेष म्हणजे गत महिन्यात 30 ते 40 रुपयांवर गेलेली पालेभाज्या आता आठ ते दहा रुपयांना मिळत आहेत , नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये मोठया प्रमाणात पालेभाजी आवक होत असून , मेथी, शेपू, कंदापात, पालक ,कोथिंबीर जुडी चार ते आठ रुपये ना उपलब्ध आहे तर किरकोळ मार्केट मद्ये 10 ते 15 रुपयांना भेटत आहे.