Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Breaking News Live Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच याविषयी सभागृहात खडाजंगी होणार का? अशी चर्चा आहे. त्याचबरोबर, विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आहे. देश-विदेशातील व महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा, जाणून घेऊया एका क्लिकवर 

5 Jul 2024, 21:33 वाजता

लवकरच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा होणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत...महाविकास आघाडीची आज वायबी सेंटर येथे बैठक पार पडली...या बैठकीला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित होते... तर विधानसभा जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली आणि विधान परिषद रणनितीवर चर्चा झाल्याचंही शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं... बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, अनील देशमुख, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते...

5 Jul 2024, 20:11 वाजता

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिर 7 ते 11 जुलै पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जोतीबा देवाच्या मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने मंदिर 7 ते 11 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. पुरातत्व विभागाच्यावतीने संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार असल्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी उत्सव मुर्ती दर्शनासाठी ठेवली जाणार. जोतीबा देवाच्या मूर्तीला संवर्धन प्रक्रियेची गरज असल्याने संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती मार्फत रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.

5 Jul 2024, 19:04 वाजता

नाशिकमधील नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचं समोर आलंय. तडकाफडकी कांदा व्यापार प्रमख सुनिल कुमार आणि पिंपळगावचे लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून उचलबांगडी करण्यात आलीये. नाफेड आणि एनसीसीएफची गोदामं एकच आहेत..एकत्र खरेदी दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आलाय. नाफेडचा कांदा परस्पर दुबईला फिरवण्यात आलाय..दुय्यम दर्जाचा कांदा नाफेडला दाखवून नाफेडचीही फसवणूक करण्यात आलीये.... 

5 Jul 2024, 16:34 वाजता

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 
विधीमंडळातही टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणारेय. 

5 Jul 2024, 15:13 वाजता

 महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प झालंय. स्वाफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तीन दिवसापासून यंत्रणा ठप्प आहे. डिस्चार्जसाठी परवानगी मिळत नसल्याने अनेक रुगणालय मध्ये हजारो रुग्ण डिस्चार्ज न मिळाल्याने अडकून पडले आहेत.  सरकारने पांढऱ्या रेशनकार्ड धारकाना देखील लाभ देण्याची घोषणा केली पण यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्याने गोंधळ उडालाय. नवीन स्वाफ्टवेअर अपडेट करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पेशंट डिसचार्ज झाल्यास बिलाची जबाबदारी कोण घेणार ? या साठी रुग्णालयांनी बरे झालेल्या पेशंट ला डिस्चार्ज देणे बंद केलं.

5 Jul 2024, 13:51 वाजता

Breaking News Live Updates: वरंध घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला

भोर महाड मार्गावरील वरंध घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळ्यानं अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात चालकाला धुकं आणि पाऊस यामुळं वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने, रात्रीच्या सुमारास पिकअप टेम्पो रस्त्याच्या कडेच्या दरीत नीरा देवघर धरणाच्या पात्रात कोसळला

5 Jul 2024, 12:11 वाजता

मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली: अजित पवार

5 Jul 2024, 12:10 वाजता

Breaking News Live Updates: झी २४ तासच्या वृत्ताची विधीमंडळात दखल

जळगाव जिल्ह्यात पीकविमा कंपन्यांनी पात्र असतानाही अनेक दावे फेटाळून लावले आहेत. ७७,९३८ पैकी ६६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. ५९३ कोटी विमा दिला गेला. ८२१ कोटी रूपये प्रिमियम भरला होता. त्यातील जळगावमध्ये ३७३ कोटी प्रिमियम भरला होता व जळगाव जिल्ह्यात ५९३ कोटी दिले गेले. १०९१९ प्रस्तावांमध्ये केळीपीक आढळून आले नाही. नंतर पुनर्तपासणी केल्यावर २९ शेतक-यांना भरपाई दिली गेलीय. काहींनी मोकळ्या जमिनीवर,नदीपात्रात केळी दाखवली आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

5 Jul 2024, 12:09 वाजता

Breaking News Live Updates: 6 जुलै रोजी महायुतीचा मेळावा 

विधान परिषद आणि विधानसभेच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व. आमदार खासदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित 

5 Jul 2024, 10:53 वाजता

Breaking News Live Updates: सकाळी सकाळी ठाणेकरांना मनस्ताप; वाहतुकीची प्रचंड कोंडी

घोडबंदर मार्ग तसेच ब्रम्हांड,कोलशेत वर्तक नगर इथेही मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे घोडबंदर वहिनी वर, आनंद नगर सिग्नल येथे मल्टी एक्सल ट्रक बंद पडला आहे. ते काढण्याची काम चालू आहे त्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे.