Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Breaking News Live Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच याविषयी सभागृहात खडाजंगी होणार का? अशी चर्चा आहे. त्याचबरोबर, विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आहे. देश-विदेशातील व महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा, जाणून घेऊया एका क्लिकवर 

5 Jul 2024, 07:28 वाजता

Breaking News Live Updates: अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांब्यांवरून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. 

5 Jul 2024, 07:27 वाजता

Breaking News Live Updates: पालखी सोहळ्यात राहुल गांधींच्या येण्यावरून टीका

संतांच्या पालखी सोहळ्यात राहुल गांधी यांनी कॅट वॉक करू नये. काँग्रेस आणि शरद पवार राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर करत आहेत. भाजप नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची टीका

5 Jul 2024, 06:34 वाजता

Breaking News Live Updates: हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री; तिसऱ्यांदा घेतली शपथ

हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 8 जुलै रोजी हेमंत सरकारची फ्लोर टेस्ट होणार त्याचबरोबर विधानभवनात बहुमतदेखील सिद्ध करणार.

5 Jul 2024, 06:23 वाजता

Breaking News Live Updates: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीवर खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने विविध विषयांवरील मंत्रिमंडळाच्या विशेष समितींच्या आज घोषणा केली. गुंतवणूक आणि विकास या विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीवर शिवसेना खासदार केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) श्री. प्रतापराव जाधव यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

5 Jul 2024, 06:23 वाजता

Breaking News Live Updates: कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी १९ महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार

-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-या मुलींची १०० टक्के शुल्काची प्रतिपुर्ती होणार
-गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय होणार
-शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल
-काजू उत्पादक शेतक-यांना अनुदान
-नविन पर्यटन धोरणासह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार