Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर 

Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Breaking News Live Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच याविषयी सभागृहात खडाजंगी होणार का? अशी चर्चा आहे. त्याचबरोबर, विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आहे. देश-विदेशातील व महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा, जाणून घेऊया एका क्लिकवर 

5 Jul 2024, 10:53 वाजता

Breaking News Live Updates: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा अपघात; एक ठार

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली जवळ बोरघाटात नवीन बोगद्यात तीन वाहनांचा अपघात झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून ट्रेलर, कार कंटेनर आणि गॅस टँकर एकमेकांना धडकले. अक्षय ढेले असे मृत टँकर चालकाचे नाव आहे

5 Jul 2024, 10:29 वाजता

Breaking News Live Updates:  विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाहीः अजित पवार 

माझ्याकडे दोन उमेदवार जिंकतील इतक्या आमदारांची संख्या पाठिशी आहे. त्यामुळं उमेदवार मागे घेणार नाही. आमचे संख्याबळ योग्य आम्ही 9 उमेदवार ठेवणार, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

5 Jul 2024, 10:07 वाजता

Breaking News Live Updates: पोलीस भरतीच्या परीक्षेची संधी देण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन 

पोलीस भरती 2022-23 मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. वय गेलेल्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. पोलीस भरती 2022-23 मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु. कागदपत्रे उशिरा मिळाल्याने बऱ्याच SEBC उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही त्यांना भरती मध्ये फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करू द्यावी या विविध मागण्यांना घेवून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हे युवक आंदोलन करत आहेत. 

5 Jul 2024, 09:37 वाजता

Breaking News Live Updates:   भिवंडी नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढण्याची शिक्षा 

अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेली आहे.जेणेकरून यापुढे ते पुन्हा या नदीपात्रात पोडण्यासाठी जाणार नाहीत.

5 Jul 2024, 09:36 वाजता

Breaking News Live Updates: शेगाव संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखीचे धाराशिव जिल्ह्यात आगमन

आषाढी वारीसाठी श्री क्षेञ शेगावहुन निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी दिंडी हरी नामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली असुन जिल्ह्यातील कळंब शहारात या पालखीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले

5 Jul 2024, 09:36 वाजता

Breaking News Live Updates: हाथरसमध्ये पोहोचले राहुल गांधी; चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांची घेणार भेट

5 Jul 2024, 08:12 वाजता

Breaking News Live Updates:  विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?

लोकसभा निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच सर्वांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत. परंतु त्‍यापूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका घेण्‍याचा विचार सुरू आहे. त्‍यादृष्‍टीने निवडणूक आयोगाने पावले टाकण्‍यास सुरूवात केली आहे. मुदत संपलेल्‍या आणि आगामी काळात मुदत संपणारया ग्रामपंचायतींच्‍या अंतिम मतदार याद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम घोषित करण्‍यात आला आहे. 

5 Jul 2024, 08:11 वाजता

Breaking News Live Updates:  मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच

T-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्व विजेत्या क्रिकेट टीमचे मुंबईत प्रथमच आगमन झालं मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियमच्या दरम्यान खुल्या बस मधून वर्ल्ड कप घेऊन भारतीय क्रिकेट टीमने हजारोंच्या संख्येने जमा झाले होते. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच पडलेला होता. पालिका कर्मचारी चपलांचा खच जमा करत आहेत. चार छोट्या गाड्या आणि तीन मोठे डंपर भरून आतापर्यंत जमा झाले चपला बूट. टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने जमा झाले होते क्रिकेटप्रेमी.गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

5 Jul 2024, 07:30 वाजता

Breaking News Live Updates: अजित पवार करणार शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा?

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात भरमसाठ घोषणांचा पाऊस पडला असला तरी अर्थमंत्री अजित पवार आजही काही घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अजित पवार आज १२ वाजता उत्तर देतील. यावेळी ते शेतक-यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करणार आहेत. तसंच सीमाभागात राहणा-या मराठी बांधवांसाठीही ते घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

5 Jul 2024, 07:28 वाजता

Breaking News Live Updates: सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण होवून आज गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे.