MS Dhoni and Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस आहे. त्याने टीम इंडियाला पहिला टी 20 वर्ल्ड कप मिळवून दिला. बॅट तसेच स्टम्पच्या मागे त्याने अनेक रेकॉर्ड्स केले. आयपीएलमध्ये खेळताना सीएसकेला 5 वेळा टायटल मिळवून दिले. मैदानात तो टिमसोबत राहिलाच पण मैदानाबाहेरही कधी वेळ पडली तर टिम प्लेयर्ससोबत राहायला तो मागे हटला नाही. असाच एक किस्सा विराट कोहलीसोबत घडला होता. जेव्हा कोहलीचं करिअर धोक्यात आलं होतं. पण तिथे धोनी होता म्हणून कोहली ड्रॉप होता होता राहिला. काय झालं होतं नेमकं? जाणून घेऊया.
टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये कोहलीच्या शानदार बॅटींगच्या जोरावर आपण वर्ल्ड कप जिंकला. यानंतर कोहलीने टी 20 वर्ल्ड कपमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा त्याचे करिअर धोक्यात आले होते. सिलेक्टर्सना कोहली नको होता. ते त्याला ड्रॉप करु इच्छित होते. पण धोनीच्या खेळीने तो ड्रॉप होण्यापासून वाचला.
टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन विरेंद्र सेहवाग याने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. 2012 साली सिलेक्टर्सचा निर्णय अंमलात आला असता तर कोहलीला कधी टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसती. कोहली सलग अनेक गेम्समध्ये चांगली खेळी करु शकला नव्हता. ऑस्ट्रेलिया सिरिजवेळी तो चालला नव्हता. अशावेळी निवड समितीला कोहली टेस्ट मॅच साठी नको होता. पहिल्या 2 टेस्टमध्ये कोहलीने 10.75 च्या सरासरीने रन्स बनवले होते. त्या टिममध्ये सेहवाग उप कप्तान तर धोन कप्तान होता.
2012 मध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि मी (विरेंद्र सेहवाग) ने मिळून कोहली जागा वाचवली होती. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कोहलीच्या जागी रोहित शर्माला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कॅप्टन धोनीने कोहलीला खेळवायचे असा निर्णय घेतला आणि त्यावर तो ठाम राहिला.
कॅप्टन धोनी आणि उप कॅप्टन मी (विरेंद्र सेहवाग) मिळून निर्णय घेतला आणि कोहलीला प्लेईंग इलेव्हनमध्ये सहभागी करुन घेतले. यानंतर जे झालं तो इतिहास आहे. कोहलीने पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 75 रन्सची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावे 80 शतक आहेत. धोनीने तेव्हा विश्वास दाखवला नसता तर टीम इंडियाला कोहलीसारखा उत्तम खेळाडू गवसला नसता, असेही विरेंद्र सेहवागने सांगितले.