Maharashtra Breaking News LIVE: मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगमधून

Maharashtra Breaking News LIVE: मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा

Maharashtra Breaking News LIVE: आजपासून राज्यात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. 

3 Oct 2024, 07:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी १ वाजता सेना भवनात पत्रकार परिषद

3 Oct 2024, 07:34 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.

3 Oct 2024, 06:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. फुफुसला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.