Breaking News LIVE: पुणे अत्याचार प्रकरण; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Breaking News LIVE: पुणे अत्याचार प्रकरण; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

4 Oct 2024, 08:15 वाजता

अपल्पवयीन गुन्हेगारीसंदर्भातील वयोमर्यादा 18 वरुन 14 करण्याचा विचार

राज्यात बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारशी निगडित आहे त्यामुळे अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

4 Oct 2024, 08:11 वाजता

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर  व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.  कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.