Breaking News LIVE Updates: परळी विधानसभा मतदार संघात तुतारीची ताकद वाढणार

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा 

Breaking News LIVE Updates: परळी विधानसभा मतदार संघात तुतारीची ताकद वाढणार

Breaking News LIVE Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सांगलीला अद्यापही पुराचा धोका कायम आहे. त्याचबरोबर, आज महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगमधून जाणून घ्या. 

27 Jul 2024, 19:03 वाजता

परळी विधानसभा मतदार संघात तुतारीची ताकद वाढणार

ॲड माधव जाधव यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

घाटनांदूर चे मूळ रहिवासी असलेले प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.माधव जाधव हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला असून ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.मराठा चेहरा आणि विधीत्न असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो. माधव जाधव यांच्या प्रवेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठा आव्हान मानले जाते

27 Jul 2024, 18:23 वाजता

पॅरिस ऑलिम्पिक - मनु भाकर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत

मनु भाकर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत पोहोचली आहे. 
मनुने सातत्यपूर्ण नेमबाजी करत पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवले.
अव्वल 8 नेमबाज अंतिम लढतीसाठी पात्र होतात. भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवान 15 व्या स्थानी राहिली. 
मनुची अंतिम फेरी उद्या होईल.

 

27 Jul 2024, 16:58 वाजता

खासदार उदयनराजे भोसले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दिल्लीत

निती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल 

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सातारा लोकसभा खासदार उदयनराजे भोसले शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल

27 Jul 2024, 16:16 वाजता

नवी मुंबईत इमारत कोसळून 3 ठार, बचावकार्य थांबवलं

नवी मुंबई - शहाबाज गावातील इमारत पडून तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी 
सर्वांना बाहेर काढल्याने बचावकार्य थांबवलं

27 Jul 2024, 15:56 वाजता

बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता बैठकीला सुरवात

शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते बैठकीला हजर 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक कशी लढाईची यावर सुरू चर्चा 

बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढण्यासाठी तयारीच्या सूचना

लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बीडमध्ये पहिलीच बैठक

27 Jul 2024, 15:21 वाजता

ठाणे-पाकिस्तान प्रकरण

ठाण्याहून पाकिस्तानला जाऊन तेथील तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानला गेलेल्या सनम खानला ठाणे न्यायलयाने सुनावली न्यायालयीन कोठडी 

दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सनम खानची आता होणार ठाणे कारागृहात रवानगी 

सनम खानसह तिला पाकिस्तानला जाण्यासाठी बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोड यालादेखील ठाणे न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

27 Jul 2024, 14:31 वाजता

Breaking News LIVE Updates: मुसळधार पावसाचा फटका; राजापूर तालुक्यातील15 गावं पाच दिवसापासून अंधारात

कोकणातील मुसळधार पावसाचा फटका कोकणातील ग्रामीण भागाला. राजापूर तालुक्यातील जामदा खोऱ्यातील 15 गावं पाच दिवसापासून अंधारात

27 Jul 2024, 14:01 वाजता

Breaking News LIVE Updates:  रत्नागिरीमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करणारा डॉक्टर गजाआड

बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला रत्नागिरीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा सापळा रचून गजाआड करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील टीआरपी या भागात असलेल्या साई हॉस्पिटलमधील डॉक्टर अनंत शिगवण याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

27 Jul 2024, 13:15 वाजता

केंद्रातील सरकार पडणार का? शरद पवार म्हणतात... 

केंद्रतील सरकार पडणार की नाही मला माहित नाही, पण असे का म्हणतात. जोपर्यंत दोघे मोदीसोबत आहे तोपर्यंत सरकारला अडचण नाही. आधी सत्ता मोदींच्या हातात होती आता वाटेकरी आले आहे.

27 Jul 2024, 12:46 वाजता

Breaking News LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिल्लीला रवाना; अमित शहांसोबत बैठक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर आज दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. आज अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे