Breaking News LIVE Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सांगलीला अद्यापही पुराचा धोका कायम आहे. त्याचबरोबर, आज महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगमधून जाणून घ्या.
27 Jul 2024, 09:23 वाजता
Breaking News LIVE Updates: पुण्यात पावसाचा विक्रम; एकाच दिवसांत 114 मिलीमीटर पाऊस
जुलै महिन्यात एकाच दिवसात म्हणजे 25 जुलै रोजी शहरात 114.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजवर पडलेल्या एका दिवसातील हा तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे. याआधी 1958 मध्ये 130.4 मिली मीटर आणि 1967 मध्ये 117.9 मिलीमीटर पाऊस पडला होता.म्हणजे याच वर्षी दोनदा असा पाऊस झालाय. 9 जूनला पुण्यात 117.1 मिलिमीटर पाऊस झाला होता.
27 Jul 2024, 08:51 वाजता
Breaking News LIVE Updates: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. रक्ताचा नमुने तपासणीत विजय वडेट्टीवार याना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालं आहे. काल प्रकृती बिघडल्यानं खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मुंबईवरून गुरुवारी संध्याकाळी आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी सर्व दौरे रद्द केले होते.
27 Jul 2024, 08:43 वाजता
Breaking News LIVE Updates: कोयना धरणातून होणारा विसर्ग वाढणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणातून होणारा विसर्ग वाढण्यात येणार आहे.सकाळी 9 वाजल्यापासून 40 हजार क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणारी पाण्याची आवक सुरूच असल्याने विसर्ग वाढणार. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
27 Jul 2024, 08:20 वाजता
Breaking News LIVE Updates: पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू
पुण्यामध्ये पाऊस थांबला असून त्याचप्रमाणे मुठा नदीला आलेला पूर देखील ओसरला आहे. त्यामुळे नदीतील भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुरामुळे भिडे पुलासह महापालिकेतील जयवंतराव टिळक पूल पाण्याखाली गेला होता. या पुलांवरील तसेच नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे.
27 Jul 2024, 07:45 वाजता
Breaking News LIVE Updates: कृष्णा काठाला दिलासा; पाणी पातळीतील वाढ मंदावली
सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढत आहे.तासाला फुटाने वाढणारी पातळी आता तासाला इंचाने वाढत असून गेल्या 12 तासात कृष्णेच्या पाणी पातळीत केवळ 7 इंचाने वाढ झाली आहे,त्यामुळे पाण्याची पातळी 39.7 फूट इतकी झाली आहे,इशारा पातळी ही 40 फूट आहे.यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे.तर नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा काहीस जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे.
27 Jul 2024, 06:35 वाजता
Breaking News LIVE Updates: नवी मुंबईत इमारत कोसळली; 2 जण अडकले
नवी मुंबईतील शहाबाज गावात तीन मजली इमारत कोसळली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारती खाली 2 जण अडकले असून एकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्य सुरू आहे.
27 Jul 2024, 06:33 वाजता
Breaking News LIVE Updates: कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन आर्मीचे पथक दाखल
सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे. कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पाडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून पथकाला पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
27 Jul 2024, 06:32 वाजता
Breaking News LIVE Updates: पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फुटांनी वाढली
कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदी काठचे नागरीक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. जिल्हयात अजूनही अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आत्ता महापुराकडे सुरू झाली आहे.