Breaking News LIVE Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सांगलीला अद्यापही पुराचा धोका कायम आहे. त्याचबरोबर, आज महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगमधून जाणून घ्या.
27 Jul 2024, 12:41 वाजता
Breaking News LIVE Updates: पश्चिम रेल्वेच्या बोईसर येथे मालगाडीचे डबे घसरले
पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ माल गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले आहेत. मालगाडीचे मागच्या भागातून चार डब्बे रुळावरून घसरले असून सुदैवाने कुठलीही जिविहानी नाही.रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल. मालगाडीचे हे डब्बे घसरले असले तरीही पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम नाही.सर्व रेल्वे सेवा सुरळीत आहे
27 Jul 2024, 12:40 वाजता
Breaking News LIVE Updates: संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपावर चर्चाः शरद पवार
27 Jul 2024, 12:39 वाजता
Breaking News LIVE Updates: लोकसभेसारखा निकाल विधानसभेला लागला तर आम्हाला आनंदः शरद पवार
27 Jul 2024, 11:56 वाजता
Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या
ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या आहेत. अर्धवट बैठक सोडून ममता बॅनर्जी निघाल्या आहेत. बैठकीत बोलू दिले नसल्याबाबत मनता बॅनर्जींची नाराजी व्यक्त केली आहे. पाच मिनिटेच बोलू दिले त्यानंतर थांबवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
27 Jul 2024, 11:54 वाजता
Breaking News LIVE Updates: मुंबई अहमदाबाद महामार्गांवर वाहतूक कोंडी; 8 ते 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई अहमदाबाद महामार्ग पुन्हा वाहतूक कोंडीत अडकला आहे. महामार्गांवर पडलेले खड्डे, विरुद्ध दिशेने येणारी वाहने व सुरू असलेल्या कामामुळे सकाळपासून गुजरात हून मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या आहेत. घोडबंदरच्या फाउंटन हॉटेल पासून ते वसईपर्यंत असा एकूण ८ ते १० किलोमीटर पर्यंत अनेक वाहने कोंडीत अडकून पडली आहेत.
27 Jul 2024, 11:51 वाजता
Breaking News LIVE Updates: समुद्राला मोठी भरती; किनाऱ्यावर कचऱ्याचे ढीग
मुंबई समुद्राला मोठी भरती आहे आणि या भरतीनंतर मुंबईतल्या सर्वच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येत आहे. दादर, माहीम चौपाट्यांवर हा कचरा जास्त दिसतो.या कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त थर्माकोल प्लास्टिक याचाच भरणा आहे
27 Jul 2024, 10:36 वाजता
Breaking News LIVE Updates: कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती, बोटीतून लोकांना सोडलं जातं आहे
कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती आहे.. त्यामूळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या वतीने ज्या गावाचा संपर्क तुटला आहे, त्या ठिकाणी बोटीतून लोकांना सोडलं जातं आहे.
27 Jul 2024, 10:05 वाजता
Breaking News LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली
शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणा सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ३ सप्टेंबर रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही सुनावणी ३० जुलै रोजी होणार होती. त्याबाबत तारीखही अपडेट करण्यात आली होती. परंतु आता ही सुनावणी एक महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी निर्णय होणार का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे
27 Jul 2024, 10:02 वाजता
Breaking News LIVE Updates: पश्चिम विदर्भाची भाजपची कोर कमिटीची बैठक
मागील लोकसभेत पश्चिम विदर्भात भाजपाला बसलेल्या फटक्यानंतर भाजपची पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठक अकोला येथे आज घेण्यात येत आहे. या बैठकीत अकोला शहर, अकोला ग्रामीण, अमरावती जिल्हा शहर व ग्रामीण, यवतमाळ जिल्हा शहर व पुसद जिल्हा तसेच वाशीम जिल्हा, बुलढाणा व खामगाव जिल्हा अशा नऊ संघटनात्मक कोर कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती राहणार आहे.
27 Jul 2024, 09:57 वाजता
Breaking News LIVE Updates: बाबाजानी दुर्राणींनी आज पुन्हा घेतली शरद पवारांची भेट
आज संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन मध्ये मी दोन वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन मिळालेलं नाही. विचारसरणीच्या आधारावर मी प्रवेश करत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने फक्त मतदारसंघात नाही तर पूर्ण राज्यात माझं स्वागत होईल, असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलं आहे.