Maharashtra Breaking News LIVE: अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यूबरोबरच आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी चर्चेत असून याचसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा...

Maharashtra Breaking News LIVE: अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

24 Sep 2024, 17:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नाशिकमध्ये शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना दिली धडक

नाशिकमध्ये शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना दिली धडक. अपघातात कुठलीही जीवित हानी नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवशाही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. 

24 Sep 2024, 17:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी साचलं पाणी
 
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने तळकोकणात दमदार हजेरी लावलीय. काल रात्रीपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाने आज जोर धरलाय. त्यामुळे कुडाळ शहरात पाणी थेट रस्त्यावर आले आहे. नाल्यांची सफाई झाली नसल्याने वाहन चालक, पादचारी व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गटारातील पाणी रस्त्यावर आले असल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

24 Sep 2024, 16:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मिरारोडमधील रुग्णालयात राडा

मिरारोडमधील लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये गोंधळ झाला आहे. हॉस्पिटल स्टाफला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. एक रुग्णाला रुग्णायलात घेऊन आले असता, वॉचमेननी गेट न उघडल्याने वॉचमेनला कानशीलात लावली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

24 Sep 2024, 16:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वडीगोद्री महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

जालना -वडीगोद्री महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. रास्ता रोको करून मराठा आंदोलकांनी हा रस्ता बंद केला आहे. अर्ध्या तासापासून मराठा आंदोलकांनी या मार्गावर आंदोलन सुरु केलं आहे . मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

24 Sep 2024, 16:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: नागपूरमधील मेट्रो शंकरनगर स्टेशनजवळ बंद पडली

शंकर नगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक कारणांमुळे एक मेट्रो बंद पडली. बंद पडलेल्या मेट्रोमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. 

24 Sep 2024, 15:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. सीआयडी अधिक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार आहे. 

24 Sep 2024, 15:10 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मुंबई सिनेट निवडणूक याचिका मागे

मुंबई सिनेट निवडणुकीच्या स्थगिती संदर्भातील याचिका महाराष्ट्र स्टुडंट युनियनने मागे घेतली आहे. 

24 Sep 2024, 14:43 वाजता

सिंधुदुर्गात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट

24 Sep 2024, 14:06 वाजता

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.

24 Sep 2024, 14:06 वाजता

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.