Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या मृत्यूबरोबरच आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी चर्चेत असून याचसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा...

Maharashtra Breaking News LIVE: धुळे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक सुरू

24 Sep 2024, 14:43 वाजता

सिंधुदुर्गात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट

24 Sep 2024, 14:06 वाजता

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.

24 Sep 2024, 14:06 वाजता

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं म्हणून महिलांचा आक्रोश

आंतरवली सराटी: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश. उपोषण मागे घेण्याची मागणी. पाणी प्यावं असा महिल आग्रह करत आहेत.

24 Sep 2024, 13:19 वाजता

अक्षय शिंदेंच्या शवविच्छेदनाला सुरुवात; 2 तास चालणार प्रक्रिया

अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पोलिसांकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुपारी एक वाजता शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयाकडे सोपवण्यात आला असून पुढील दोन तासांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

24 Sep 2024, 12:59 वाजता

शरद पवार जरांगेंबरोबर हे स्पष्ट झालं : प्रकाश आंबेडकर

"शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत हे आता स्पष्ट झालं आहे," असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. "जरांगेच्या मागणीला त्यांचा पाठींबा आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

24 Sep 2024, 12:58 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला

राज ठाकरे सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल झाले आहेत. ठाकरेंवर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे भेटीला आल्याची माहिती समोर येत आहे. उद्या संध्याकाळी ताज लँड्स एंडला राज ठाकरे यांच्यावरील 'येक नंबर' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडणार आहे.

24 Sep 2024, 12:56 वाजता

संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी...; अक्षय शिंदे मृत्यूवरुन प्रकाश आंबेडकरांची मागणी

बदलापूर घटनेतील आरोपींना सुरुवातीला शोधण्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अपयश आलं होतं, असं प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. "सुरुवातीपासून आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी खरी माहिती यावी यासाठी ज्या पोलिसाला गोळी लागली आहे, त्याचा मेडिकल रिपोर्ट समोर आणावा," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. "नेमक्या कशाच्या शोधासाठी अक्षय घेऊन जात होते? ते समोर आलं पाहिजे. कुणाला वाचवण्यासाठी हे केलं गेलं का हे समोर आणलं पाहिजे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

24 Sep 2024, 11:31 वाजता

अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन पोलीस जे. जे. रुग्णालयात

अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन पोलीस अधिकारी शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाले आहेत. ठाण्यातील कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणण्यात आला आहे.

24 Sep 2024, 10:58 वाजता

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटना यांची निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी आहे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भारती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आज सिनेट निवडणुकीसाठी एकीकडे मतदान होत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष आहे.

24 Sep 2024, 10:56 वाजता

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केल्यानंतर याचिका

मागच्या 2 आठवड्यात कोर्टाने या सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या होत्या मात्र त्यावर सुनावणी नव्हती झाली.

कोर्टाने आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली असल्याने आज तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं!

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आणि त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार असल्याने या प्रकरणाचा निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे.

आज कोर्टाने प्रकरण ऐकलं तर सुनावणीची दिशा निश्चित होईल.