Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर 

Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर 

22 Jun 2024, 19:31 वाजता

सीईटी परीक्षा निकालात गोंधळ यासंदर्भात आम्ही राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली. या सगळ्याची आन्सर शीट मिळावी. 54 चुका कशा झाल्या यावर आयुक्त राजीनामा देणार का? ऑब्जेक्शन घेण्यात पैसे कमवले जात आहेत. या विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड मिळावेत. यावर उच्च शिक्षणमंत्री का बोलत नाहीत ? डीटीईचे डायरेक्टर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

22 Jun 2024, 18:53 वाजता

संविधानिक पदावर राहून एका समाजाचा आकस करणाऱ्या द्वेष बाळगणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे  राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली. ओबीसी मधील आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये उपोषणांचे सत्र सुरू आहे अशातच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे. छगन भुजबळ हे मंत्रिपदाच्या गोपनीयतेचा भंग करत आहेत. जातीयवादी पद्धतीने एखाद्या आंदोलना पाठीबा देत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असे ते म्हणाले.

22 Jun 2024, 17:51 वाजता

नांदेडमधील भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिलाय. सूर्यकांता पाटील या माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भाजपचं प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचाही त्यांनी राजीनामा दिलाय. कोणतीही कटुता मनात न ठेवता आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हंटलंय. दरम्यान त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे. 

22 Jun 2024, 16:18 वाजता

मराठेसुद्धा रस्त्यावर येतील आता, तुम्हाला खेटायचं आहे. आता तर नाईलाज आहे आमचा- जरांगे 

22 Jun 2024, 16:09 वाजता

दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा; याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडे 

22 Jun 2024, 16:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकांनी पाडलं - वाघमारे

ओबीसी आंदोलनातून खळबळजनक आरोप करण्यात आलाय. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून त्यांचा बीडमध्ये पराभव झाला, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. तर छगन भुजबळ यांनीही या आरोपाला दुजोरा दिलाय. 

बातमी सविस्तर वाचा - Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप

 

22 Jun 2024, 14:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका - लक्ष्मण हाके

दीड हजार ग्रामपंचायतींचा आम्हाला पाठिंबा आहे, असंही लक्ष्णम हाके यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन मला पाठिंबा दर्शविला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, अशी मागणी त्यांनी शिष्टमंडळासमोर केली. 

22 Jun 2024, 14:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या उपोषणस्थळी दाखल

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री दाखल झाले आहेत...या शिष्टमंडळात भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आहेत...उपोषणस्थळी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करत आहेत. तर यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...तसंच अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती भुजबळांनी दिलीय...त्यामुळे हाके आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...

22 Jun 2024, 14:06 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : पर्यटकांना नयनतारा वाघिणीची भुरळ; पाहा व्हिडीओ

ताडोबातल्या नयनतारा वाघिणीने सध्या सफारी करण्याऱ्या पर्यटकांना भुरळ घातली आहे...निमढेरा बफर झोन मधील नयनतारा वाघिणीचा पाण्यात प्रतिबिंब दिसणारा एक सुरेख  व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे... वन्यजीवप्रेमी इंद्रनील मडावी यांनी हा व्हिडिओ चित्रित केलाय.. नयनतारा वाघीण आणि भोला वाघ हे भाऊ -बहीण पाणवठ्यावर विसावा घेत  थोडी मस्ती करताय...

 

22 Jun 2024, 13:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : 17 जुलैपासून आषाढ वारी सोहळा, 'या' तारखेपासून विठुरायाचं 24 तास दर्शन

पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक पार पडली.. या बैठकीत 17 जुलै रोजी आषाढ वारी सोहळा होणार असल्याची जाहिर करण्यात आलं.. 7 जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे.. या बैठकीत मानाच्या दहा पालखी प्रमुकांच्या शासकीय पूजेत बसवण्याबाबत चर्चा झाली नाही.. त्यामुळे पालखी प्रमुखांना शासकीय महापूजेत बसवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे..