Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर
22 Jun 2024, 08:57 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : राज्यातील शाळांबाबत महत्त्वाची बातमी
चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 पूर्वी भरवल्यास शाळांवर कारवाई केली जाणार आहे...राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय...त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाणार आहे...अनेक शाळा नियम करूनही सकाळी नऊपूर्वी शाळा भरवत असल्याने शिक्षण विभागाने हे पाऊल उचललंय...
22 Jun 2024, 08:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : देशात पेपरफुटीविरोधात कायदा लागू, 10 वर्ष तुरुंगवास, 1 कोटी रुपयं दंड..
शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.. पेपरफुटीविरोधात कायदा लागू करण्यात आलाय.. मध्यरात्री केंद्राने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ((या कायद्यानुसार 10 वर्षाचा तुरुंगवास आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे..तर परीक्षेला डमी उमेदवार दिल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीये..)) देशात पेपरफुटीच्या घटना वाढल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संसदेने हा कायदा पुन्हा लागू केलाय..
22 Jun 2024, 08:52 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : MHT CET परीक्षेच्या निकालात घोळ प्रकरणी आदित्य ठाकरे आज राज्यपालांची घेणार भेट
आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत...MHT CET परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याप्रकरणी दुपारी 2 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत...राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी झालेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निकाला संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत...या संपूर्ण परीक्षेत एकूण 54 चुका असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या परसेंटाईल संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत ...त्यामुळे या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत...
22 Jun 2024, 08:50 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : ठाण्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवरला आग
ठाण्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवरला आग लागलीय...अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत...या इमारतीत इमारतीत काही जण अडकल्याची भीती आहे...इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
22 Jun 2024, 08:49 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मुलांना शाळेत नेताना व्हॅनचा दरवाजा उघडून अपघात
आता एक धक्कादायक बातमी गुजरातच्या वडोदरामधून... इथला स्कूल व्हॅनमधून मुलं पडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुलांना शाळेत नेण्यासाठी स्कूल व्हॅन सोसायटीत आली होती. मुलांना घेऊन भरधाव व्हॅन जात असताना गाडीचा मागला दरवाजा अचानक उघडला गेला आणि त्यातून 2 मुली रस्त्यावर पडल्या. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली.
22 Jun 2024, 08:48 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : फुटबॉल टर्फवर इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 6 जण जखमी
ठाण्यात फुटबॉल टर्फवर इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 6 जण जखमी झालेयत...जखमी झालेल्या 6 जणांवर ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत...ठाण्याच्या गावंडबाग परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडलीय...फुटबॉल टर्फमध्ये 17 विद्यार्थी खेळत होते...त्यावेळी मुसळधार पावसामुळे रौनक पार्क फेस 2 च्या इमारतीवरील पत्र्याची शेड टर्फवर कोसळली...या दुर्घटनेत 15 वर्षांचे 6 खेळाडू जखमी झालेत...यातील 3 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत...या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, पत्र्याच्या शेडखाली विद्यार्थी अडकलेले दिसतायत...तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं...याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करतायत...
22 Jun 2024, 08:45 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : 'मविआची एकी रहावी म्हणून दोन पाऊल मागे आलो'
महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठी बातमी... महाविकास आघाडीतल्या एकजुटीसाठी दोन पावलं मागे आलो असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलीय.. आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहवी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो असं पवारांनी म्हटलंय. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा असा संदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय..
22 Jun 2024, 08:44 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : 'खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाहीत'
कुणबी दाखले खोटे असतील तर तपासू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती भुजबळांनी दिलीय. खोटी सर्टिफिकेट देणे आणि घेणे दोघेही दोषी असणार, त्याप्रमाणे कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर मराठा समाजाची एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल असा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय..
22 Jun 2024, 08:43 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : हाकेंच्या राजकीय आंदोलनामागे भुजबळ-जरांगे
हाकेंच्या राजकीय आंदोलनामागे भुजबळ असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. भुजबळांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा असा इशाराही जरांगेंनी भुजबळांना दिलाय.. मात्र कुणाची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते असं प्रत्युत्तर भुजबळांनी जरांगेंच्या इशा-यावर दिलंय. तर मी जनताच आहे असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय..
22 Jun 2024, 08:42 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मंत्री छगन भुजबळ आज घेणार हाकेंची भेट
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे...आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते हाके यांची दुपारी 2 वाजता भेट घेणार आहेत...काल राज्यातील ओबीसी नेत्यांसह हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबईत बैठक पार पडली.या बैठकीत 4 ते 5 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून आज भुजबळांसोबत चर्चा करून उपोषणाबाबत योग्य निर्णय घेऊ असं हाके यांनी स्पष्ट केलंय...