Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर
22 Jun 2024, 13:34 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरहून वडीगोद्रीकडे रवाना
सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरहून वडीगोद्रीकडे रवाना झालंय...थोड्याच वेळात शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे...या शिष्टमंडळात भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आहेत...6 मंत्र्यांसह सरकारचे प्रतिनिधी आहेत...यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...तसंच अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती भुजबळांनी दिलीय...त्यामुळे हाके आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...
22 Jun 2024, 13:22 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपी गजाआड
अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपींना, पोलिसांनी बेड्या ठोकल्यात...19 जून रोजी चोरट्यांनी दरोडा टाकत जवळपास 4 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता...दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपींना अटक केली...
22 Jun 2024, 13:19 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ
सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ केलाय. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा गोंधळ झाला आहे. खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलाय. मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी ही बैठक होतेय. चिंतन बैठकीवेळी खासदार धनंजय महाडिक, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे , माजी आमदार लक्ष्मण ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
22 Jun 2024, 13:15 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून 3 हजार रुपयांचा दंड
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आलाय...सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय...महाविकास आघाडी सरकरच्या काळात कोरोना असताना वीज दरवाढीविरुद्ध भाजपनं आंदोलन केलं होतं...त्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप नार्वेकरांवर आहे...भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू असून, 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून जारी करण्यात आलेयत...
22 Jun 2024, 13:02 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : यशोमती ठाकूर-चंद्रकांत पाटलांमध्ये बाचाबाची, खासदार कार्यालयाचा वाद टोकाला
अमरावती खासदार कार्यालयाचा वाद टोकाला गेलाय. यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. आमदर यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिलाय. भाजप सरकारविरोधात यशोमती ठाकूर यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाचे कुलूप तोडलं. आम्हाला हे सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
22 Jun 2024, 12:40 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : पाणीपट्टीत वाढ अन्यायकारक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ अन्यायकारक असून त्याविरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय...ही वाढीव पाणीपट्टी कमी करायला सरकारला भाग पाडणार, असा इशाराच पटोलेंनी दिलाय. विधानसभेत केवळ शेतकरी हाच केंद्रबिंदू असणार असल्याचं ते म्हणाले.
22 Jun 2024, 12:06 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : ठाण्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं
ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.. या पावसामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचलंय. वंदना डेपो परिसरात पाणी साचायला सुरुवात झालीये.. त्यामुळे ठाणे शहरातील रस्ते आणि रेल्वे सेवा मंदावलीये.. लोकसेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे....
22 Jun 2024, 12:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका - उदयनराजे
आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजेंनी रोखठोक भूमिका मांडलीय...जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका...अशी भूमिका उदयनराजेंनी मांडलीय...मराठा आरक्षणप्रश्नी 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे...त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आलं... त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे उदयनराजे भोसलेंनी म्हटलंय...
22 Jun 2024, 12:01 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : हाकेंच्या उपोषणास नांदेडच्या ओबीसी बांधवांचा पाठिंबा
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध जिल्ह्यातून ओबीसी बांधव एकवटत आहे. नांदेड जिल्हयातूनही ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळतोय. हाके यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून ओबीसी बांधव वडीगोद्रीला रवाना झाले. 25 गाडयांमधून ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे निघालेत. काल नांदेडच्या कंधार, लोहा तालुक्यातून शेकडो गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला होता. आज नांदेडच्या भोकर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव रवाना झाले आहेत.
22 Jun 2024, 12:00 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : बबनराव तायवाडेंना जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
ओबीसी नेते बबनराव तायवाडेंच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलंय. भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगेंनी केलाय. जरांगेंची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जातेय अशी टीका तायवाडेंनी केली होती. त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय.