Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर 

Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर 

22 Jun 2024, 11:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  भुजबळ, ओबीसी नेत्यांसाठी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

संभाजीनगर विमानतळाला छावणीचं स्वरुप आलं आहे. भुजबळ, ओबीसी नेत्यांसाठी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तगडा बंदोबस्त आहे. 3 पीआय, 4 एपीआय, 5 पीएसआय, दंगल नियंत्रण पथकाची 36 जवांनांची तुकडी, 15 कर्मचारी साध्या कपड्यात, 30 कर्मचा-यांसह मोठा बंदोबस्त तैनात

 

22 Jun 2024, 11:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  आमची एकही कुणबी नोंदी खोटी नाही- जरांगे पाटील

आमची एकही कुणबी नोंदी खोटी नाही...भुजबळांच्या सांगण्यावरून आमच्या नोंदी खोट्या ठरवू नका...नोंदी खोट्या ठरवणं सरकारला परवडणारं नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय...ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत कुणबी नोंदी खोट्या असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता...त्यावरून जरांगेंनी भुजबळांवरही निशाणा साधलाय...तर चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...

 

22 Jun 2024, 10:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  शेतीच्या पाणीपट्टीत वाढीबद्दल माहिती नाही - महाजन

शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. पाणीपट्टीत वाढ झाली असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.

22 Jun 2024, 10:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  राज्यातील शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं सुलतानी संकट 

राज्यातील शेतक-यांवर पाणीपट्टीचं सुलतानी संकट ओढावलंय...राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ केलीय...यामुळे 500 रुपयांच्या जागी 5 हजार रुपये मोजावे लागणार आहेत...2018-19 साली बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी 538 रुपये इतका होता...मात्र, आता नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतक-यांसाठी वार्षिक एकरी 5 हजार 443 रुपये इतका होणार आहे....एका झटक्यात झालेली ही दहापट दरवाढ बागायतदार शेतक-यांचे कंबरडे मोडणाराय...राज्यात ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे...जलसंपदा विभागाने 29 मार्च 2022 रोजी जलदराचे पुनर्विलोकन व सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक अध्यादेश जारी केलाय...

22 Jun 2024, 10:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  कोल्हापुरात रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आक्रमक 

पन्नास रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आक्रमक झालीय. 25 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौ-यावर आहेत. याच दिवशी रिक्षा आणि टॅक्सी एक दिवसीय संपावर जाण्याचा इशारा या समितीनं दिलाय. या संपात 16 हजार रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होतील, असा दावाही या समितीनं केलाय.

22 Jun 2024, 09:43 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  वाशिम जिल्ह्यात अखेर पावसाची हजेरी 

वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावलीय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. वाशिमसह मानोरा तालुक्यात काही ठिकाणी पावासानं हजेरी लावली. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यानं दुबार पेरणीचं संकटही टळलंय. त्यामुळे शेतकरीराजा आनंदी झालाय. 

22 Jun 2024, 09:42 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  ओबीसी आंदोलनांमुळे सरकारची कोंडी 

राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनांमुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय. आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी वरिष्ठ मंत्र्यांची कसरत सुरुय. जालन्यातील वडी बुद्रुकमध्ये लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे उपोषण करतायत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. ससाणेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याची टीका सुरू होताच त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्यायत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि तर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आज सकाळी 11 वाजता ससाणेंच्या भेटीसाठी येतायत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भेट होणारेय.

22 Jun 2024, 09:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  निलेश लंके घेणार उद्धव ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत...मातोश्रीवर जाऊन लंके सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत...निवडणुकीत मदत केल्यामुळे ही आभार भेट असल्याचं बोललं जातंय...

22 Jun 2024, 09:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  'एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला'

भाजपनंच एकनाथ शिंदे यांचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपनं असं करणं योग्य नसल्याचं सांगत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला. विरोध असेल तिथं उमेदवार बदलला नाही. त्याच वेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप करीत त्यांनी भाजपला आव्हान दिलंय.

22 Jun 2024, 08:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

उद्या मध्य आणि हार्बर या दोन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बरवर सीएमएमटी ते चुनाभट्टी असा मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणारेय. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय.

अधिक माहितीसाठी या बातमीवर क्लिक करा - Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!