Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर 

Breaking News LIVE : सीईटी परीक्षा निकालात गोंधळ; आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर 

22 Jun 2024, 08:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE :  'ओबीसी नेते, जरांगेंना समोरासमोर बसवून तोडगा काढा'

मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली... या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.. तर ओबीसी नेत्यांच्या वतीने पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय बनसोडे, गोपीचंद पडळकरही बैठकीला उपस्थित होते.. ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार तसंच मराठा समाजाप्रमाणे ओबीसींनाही तितकाच निधी दिला जाणार असल्याची माहिती भुजबळांनी या बैठकीनंतर दिली.. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांना समोरासमोर बसवून तोडगा काढा अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.. तसंच सगेसोयरेचा निर्णय घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.