Breaking News LIVE Updates: रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

Breaking News LIVE Updates : पाऊस आला आणि न संपणारी भीती देऊन गेला. मुंबईच्या लोकलची काय स्थिती? पाहा राज्यापासून देशापर्यंतच्या सर्व घडामोडी एका क्लिकवर   

Breaking News LIVE Updates: रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

Breaking News LIVE Updates : मंगळवारी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातू ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय.

राज्यात पावसानं बहुतांश भागांना झोडपणं सुरु असतानाच तिथं देशातही चित्र वेगळं नाही. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसानं चिंता वाढवली आहे. तर, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद शमण्याचं नाव घेत नसल्यामुळं देशातील संरक्षण यंत्रणेपुढील आव्हानं वाढताना दिसत आहेत. यासंदर्भातील सर्व घडामोडींचे Live Updates खालीलप्रमाणे... 

9 Jul 2024, 22:32 वाजता

Breaking News LIVE Updates : सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, सह्याद्रीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर

सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका असा सह्याद्रीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर उमटला आहे. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल. त्याच सोबत कुणबी  प्रमाणपत्र देण्याचे ही थांबावा अशा प्रकारची काही ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ऐकून घेण्याची भूमिका घेतली आहे.

9 Jul 2024, 21:31 वाजता

Breaking News LIVE Updates: रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

11 जुलै ते 13 जुलै असे तीन दिवस महामार्ग 4 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या काळासाठी वाहतूक बंद ठेवणार आहेत. कोलाड जवळील पुई येथील म्हैसदरा नदीवरील पुलाचे काम सुरु आहे. पुलाच्या कामासाठी गर्डर  टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 3 दिवस 4 तास वाहतूक बंद ठेवणार

9 Jul 2024, 19:32 वाजता

Breaking News LIVE Updates: पोलीस योग्य दिशेने तपास करतायत- संदिप देशपांडे

वरळी हिट and Run प्रकरणी संदीप देशपांडे पोलीस स्टेशन येथे पोहोचले होते. ते म्हणाले,‌ या प्रकरणांमध्ये पोलिसांशी बोलल्यानंतर मला राजकीय हस्तक्षेप वाटत नाही. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहे. जे एक कलम लावायला पाहिजे होती ती पोलिसांनी लावली आहेत. आरोपी दारू प्यायला असला किंवा दारू प्यायला नसला तरी त्याने तो गुन्हा केला आहे. त्याला योग्य दिशेने योग्य शिक्षा होईल.‌

9 Jul 2024, 18:09 वाजता

आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. प्रत्येकाला मत मांडण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे,राज ठाकरे यांनी उपस्थित राहावे. विजयराव, आपणाला विनंती आहे की आपण उपस्थित राहून मत मांडावे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तर आम्ही बैठकीला जाणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.

9 Jul 2024, 17:19 वाजता

Breaking News LIVE Updates: मिहीर शाहवर मर्डरची केसही लावा- आदित्य ठाकरे

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाहवर मर्डरची केस लावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता.. तेव्हा मिहीरला अटक करण्यासाठी 60 तास का लागले.. मिहीर शाहाला लपवण्याचा प्रयत्न झाला का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारलाय.

9 Jul 2024, 16:48 वाजता

Breaking News LIVE Updates: पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता 

सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. यावेळी पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलाय. भाजपच संख्याबळ जास्त असल्यामुळे या पदावर भाजपने दावा केला असून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सभापती पदासाठी शिंदे गट देखील आग्रही असल्याची सूत्रांची माहिती दिलीये.

9 Jul 2024, 16:10 वाजता

Breaking News LIVE Updates :वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शाहाला अटक

वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाहाला (Mihir Shah) अखर अटक करण्यात आलं आहे. तब्बल दोन दिवसांनंतर मिहिरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर फरार झालेल्या मिहिर शहाविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीसही (Look Out Notice) जारी केली होती. मिहिर शाहाला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून (Shahapur) अटक करण्यात आली  आहे.

9 Jul 2024, 14:41 वाजता

Breaking News LIVE Updates : राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 'या' शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे  प्रयत्न- हसन मुश्रीफ 

राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे  प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने 50 एम.बी.बी.एस. विद्यार्थी क्षमतेने परवानगी दिलेली आहे. उर्वरीत 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पुर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले.

9 Jul 2024, 13:07 वाजता

Breaking News LIVE Updates :  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी विधानसभेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मुंबईच्या सफाईवर खर्च केलेले पैसे गेले कुठे? मुंबईची तुंबई का झाली याची चौकशी होणार का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित तेले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथे झालेल्या पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीवर कारवाई होणार का? या शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. 

वरळी हिट अँड रन प्रकरणी महिलेला धडक देऊनही नशेबाज ड्रायव्हर तिला फरफटत नेत होता, या घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप आहे, तो थांबवा असं म्हणत योग्य की कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

9 Jul 2024, 12:31 वाजता

Breaking News LIVE Updates : नाशिकमध्ये घाटात कोसळली बस 

सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस खडतर होत असून रविवारी (ता.7) आणखी एक अपघात होऊन खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला. तर 58 प्रवासी जखमी झाले आहेत. सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परतत होती.