Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
5 Dec 2024, 19:52 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: कॅबिनेट बैठकीत 16 विषयांवर चर्चा
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आझाद मैदानावरून थेट मंत्रालयात आले. मंत्रालयातील 7 व्या मजल्यावर येऊन त्यांनी पहिली मंत्रीमंडळ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
5 Dec 2024, 19:10 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय. 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन होणार. 9 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होणार तर अधिवेशनात आमदारांचा शपथविधी होणार.
5 Dec 2024, 18:52 वाजता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठक सुरु
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठक सुरु. कॅबिनेट बैठकीनंतर फडणवीस-शिंदे आणि अजित पवार पत्रकार परिषद घेणार.
5 Dec 2024, 18:25 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल.
5 Dec 2024, 18:08 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: फडणवीसांनी थपथ घेताच नागपुरात जल्लोष
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नागपुरात जल्लोष.
5 Dec 2024, 17:47 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
5 Dec 2024, 17:44 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
5 Dec 2024, 17:40 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: 'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...', राज्यात नवीन सरकार स्थापन
महाराष्ट्रात 'देवेंद्र पर्व', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
5 Dec 2024, 17:31 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आझाद मैदानावर दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात शपथविधी सोहळयाला सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
5 Dec 2024, 17:25 वाजता
Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आझाद मैदानावर दाखल
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आझाद मैदानावर दाखल. देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.