Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

Maharashtra New Chief Minister Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

5 Dec 2024, 17:18 वाजता

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पोहचणार

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. 

5 Dec 2024, 17:07 वाजता

महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

5 Dec 2024, 17:01 वाजता

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

शपथविधी सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खान, संजय दत्त, रणवीर सिंग, शाहरुख खान अशा अनेक कलाकार शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. 

5 Dec 2024, 16:52 वाजता

Maharashtra CM Swearing-in Ceremony : शपथविधी सोहळ्याला राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही उपस्थित

 महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे. 

5 Dec 2024, 16:33 वाजता

देवेंद्र फडणवीस, शिंदे-अजित पवार थोड्याच वेळात घेणार शपथ

महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार  उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

5 Dec 2024, 16:10 वाजता

अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक 

महायुती सरकारचा आज आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच शपथविधीपूर्वी अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. 

5 Dec 2024, 15:37 वाजता

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार : उदय सामंत

महायुतीमधील तिढा संपला. दबावाचं कोणतंही राजकारण नव्हतं.  एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहेत. 

5 Dec 2024, 15:17 वाजता

गृहमंत्री अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल 

आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. 

5 Dec 2024, 14:49 वाजता

शिवसेनेचे शिष्टमंडळ सागर बंगल्यावर दाखल 

शिवसेनेचे एक शिष्टमंडळ म्हणजेच भरत गोगावले ,उदय सामंत ,रवी फाटक व संजय शिरसाठ हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.  

5 Dec 2024, 14:38 वाजता

एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी खात्री, गिरीश महाजन

एकनाथ शिंदे आज शपथ घेतील अशी खात्री आहे. ते नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.