Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
5 Dec 2024, 11:24 वाजता
राज्यातील अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते पुन्हा जोमात, कार्यकर्ते आज मुंबईला रवाना
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी राज्याच्या विविध भागातून अनुलोम संस्थेचे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस यांचा छायाचित्र लावलेले गाड्या आपल्याला रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसत आहेत या संस्थेने शासकीय विभागातील सर्वसामान्यांची कामे लवकर करून देण्याचा प्रयत्न केला आहे तसच भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून काम केले आहे . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही संस्था आता पुन्हा जोमाने सक्रिय झाली आहे
5 Dec 2024, 11:23 वाजता
वर्षा निवासस्थान परिसरात फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर्स
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला परिसरात एका संघटनेतर्फे बॅनर बाजी करण्यात आली आहे. धर्मरक्षक,महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स वर्षा बंगल्याच्या परिसरात लावण्यात आले आहेत.
5 Dec 2024, 10:51 वाजता
"दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत..." संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: अनेक माजी मुख्यमंत्र्यात त्यांच्याच पक्षाचे आहेत. कमिशनचा फौजदार पार्त २ आज आझाद मैदानावर दिसेल. उद्धव ठाकरे जातील की नाही मी कस सांगू. मी दिल्लीत आहे. प्रोटोकॉलनुसार आमदार खासदार यांना निमंत्रण येतं, मला आल आहे असं समजा. एकनाथ शिंदे १०० टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्ली सोबत पंगा घेण्याची हिम्मत त्यांच्यात अजिबात नाही. आज तिघे शपथ घेतील, बाकीच्या शपथविधीला अजून वेळ जाईल.
5 Dec 2024, 10:48 वाजता
भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास
Junior Asia Cup: ज्युनियर हॉकी आशिया चषक 2024 मध्ये भारतीय संघाने आपल्या दमदार खेळीने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. भारताने चमकदार कामगिरी करत जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला.
सविस्तर इथे वाचा > Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास
5 Dec 2024, 10:31 वाजता
"राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना..." संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावर प्रतिक्रिया
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: फडणवीस शपथ घेत आहेत यावर प्रतिक्रिया द्याव अस काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला, त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. गावागावात मॉक पोल सुरू आहेत पण तिथे १४४ लागू केलं आहे. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले.
5 Dec 2024, 10:23 वाजता
कल्याणकरांनी हातात घेतला झाडू
कल्याण पश्चिम काळातलाव येथील महानगरपालिका कचरा साफ करत नसल्याने नागरिकांनी कचरा साफ करून काळा तलाव च्या गेट बाहेर टाकला कचरा. महानगरपालिका कचरा साफ करत नसल्याने नागरिकांनी हातात घेतला झाडू .
5 Dec 2024, 10:09 वाजता
बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर शांतता
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बारामतीत मात्र शांतता असून बारामतीकर मुंबईकडे रवाना झाले आहेत. बारामती तालुक्यातील काटेवाडीतील अजित पवार यांच्या पवार फार्म या निवासस्थानासमोरून शांतात आहे.
5 Dec 2024, 09:51 वाजता
अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी, मानेगाव येथील घटना
Maharashtra: भंडारा जिल्ह्याच्या मानेगाव जवळील आभास रेस्टॉरंट जवळच्या राष्ट्रीय महामार्ग 53 ला काळविटाची जोडी रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात ट्रॅकने नर काळवीटला धडकल्याची घटना घडली असून त्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेल्यात आले.
5 Dec 2024, 09:42 वाजता
राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Forecast: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
5 Dec 2024, 09:32 वाजता
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, शाहा ते उद्धव ठाकरेसह कोणाकोणाला मिळाले निमंत्रण?
Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह 19 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय साधू-संत आणि लाडक्या बहिणींनाही निमंत्रण मिळाले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही शपथविधीसाठी आमंत्रण मिळायची माहिती मिळत आहे.