Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

Maharashtra New Chief Minister Shapath Vidhi LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

Maharashtra New CM Oath Ceremony LIVE: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय, 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या. 

5 Dec 2024, 14:32 वाजता

सरकारच्या पत्रात एकनाथ शिंदेंचं नाव - सूत्र 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

5 Dec 2024, 13:55 वाजता

Uday Samant: आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या हातात - उदय सामंत 

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. इतंकच नाही तर जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर आम्ही कोणीही मंत्री होणार नाही. आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

5 Dec 2024, 13:42 वाजता

Chhagan Bhujbal: "अजित पवारांना अर्थखात मिळेल..."  छगन भुजबळांना खात्री 

 

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: 1985 साली निवडून आलो, तेव्हापासून मी विधनभवनात आहे.  परंतु एवढी मजोरीटी कधीच मिळाली नाही. पहील्यांदाच मिळाली आहे. अर्थात यामागे प्रधानमंत्री यांचा राज्याला असलेला सपोर्ट आहे. आम्हाला एवढं बहुमत मिळाले आहे की आता अशी शंका येत आहे की नियमानुसार विरोधी पक्षनेता होणार की नाही. प्रधानमंत्री येत आहे त्यामुळे वेळेचं बंधन आहे. महत्त्वाचे हे आहे की, कोणाला किती मंत्री कोणती खाती यावर अजूनही चर्चा सुरूच आहे. नंतर तक्रारी होईल त्यामुळे आता यावर चर्चा करणे गरजेचं आहे. या आठवड्यात इतर नेत्यांचे शपथविधी होईल.  मला नाही तस वाटतं की अर्थ खात्यासाठी शिंदे गटाची मागणी आहे. त्यांची मागणी गृह खात्यासाठी आहे. मला खात्री आहे अजित दादांना अर्थ खात देण्यात येईल. 

5 Dec 2024, 13:35 वाजता

आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल- शंभूराज देसाई

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: शंभूराज देसाई यांनी जनतेचे आभार मानत बोलले की " जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिलं त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आभार मानतो. आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. शिवसेना आमदारांनी वर्षा बंगल्यावर भेटून साहेबांनी शपथ घ्यावी हा आग्रह धरला. आज पून्हा आम्ही जाणार आहोत. आमचा हक्क आहे आमच्या नेत्याकडे आग्रह करायचा. 

5 Dec 2024, 13:11 वाजता

सागर बंगल्यात शपथविधी घेण्यापूर्वी गोमातेचे पूजन 

 

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: आज 15 व्या विधानसभेसाठी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार आहेत.  या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या सागर बंगल्यावर गोमातेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सागर बंगल्यावर 2 गाई आणण्यात आल्या आहेत.

5 Dec 2024, 12:51 वाजता

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: राष्ट्रवादी अजित  पवार गटाकडून गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे.  शपथविधी सोहळ्यासाठी पास म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका पक्षाकडून देण्यात आली. प्रचारादरम्यान अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळत होते.  आता पक्षाची निमंत्रण पत्रिका देखील गुलाबी रंगाची करण्यात आली आहे. 

5 Dec 2024, 12:32 वाजता

Amit Shah: अमित शहांचा शपथविधीनिमित्त आज मुंबई दौरा 

 

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शपथविधीनिमित्त मुंबई दौरा आज होणार आहे. मुंबई विमानतळ 3.00 वाजता पोहचतील त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृह - 3:30 पर्यंत दाखल होती. यानंतर ते आझाद मैदानावर शपथविधीच्या वेळेनुसार पोहचतील. या आधी अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात आहेत. त्यामुळे त्या वेळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत बैठक होण्याची शक्यता आहे. शपथविधी पूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

5 Dec 2024, 12:05 वाजता

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या चरणी  

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुंबादेवीच्या दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या दर्शनाला आहे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. 

5 Dec 2024, 11:35 वाजता

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates:  देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात सिद्धिविनायक मंदिरात थोड्याच वेळात पोहचत आहेत,सिध्दीविनायक मंदिरात आमदार कालिदास कोळंबकर फडणवीसांच्या स्वागतासाठी पोहचले आहेत. 

 

5 Dec 2024, 11:29 वाजता

शपथविधी आधी फडणवीस करणार देवदर्शन

Maharashtra New CM Shapath Vidhi LIVE Updates: आज सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सकाळी  11:30 च्या सुमारास सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतील.  त्यानंतर ते मुंबादेवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.