Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Pune Bypoll Voting) पोटनिवणूक मतदानासाठी पुणेकरांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केली आहे. दरम्यान चिंचवडमध्ये गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.
26 Feb 2023, 10:58 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर झालेल्या राडावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. पराभवाच्या भीतीने विरोधक गोंधळ घालत आहेत, असा आरोप त्यांनी (Sanjay Raut on Kasba Chinchwad Bypoll) केला आहे. दरम्यान आज रविवार आणि त्यात पुण्यात मतदान त्यामुळे पुणेकर मतदान केंद्रावर रांगा लावतील, असा विश्वास त्यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला. पोटनिवडणुकीत मविआचाच विजय होईल असंही ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात 5 ते 6 मंत्री ठाण देऊन आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
26 Feb 2023, 10:29 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी खडकमाळ आळीमधील एपिफनी शाळेत मतदान केल. मतदारांना पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप दवे यांनी केला आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी दवे यांनी केली. तर 8 ते 10 हजार फरकाने निवडून येईल असा विश्वास दवे यांनी यावेळी व्यक्त केला.
26 Feb 2023, 10:26 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : तरुण जेष्ठ नागरिक यांच्यासह महिला (Pune Bypoll Voting) देखील सकाळपासूनच मतदान करण्यासाठी येत आहेत. उन्हाचा पारा दुपारनंतर वाढणार असल्याने सकाळी पाहिल्या टप्प्यात नागरिक स्वयंस्फुर्तीने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला येणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक एकत्रित कुटुंब मतदानासाठी बाहेर पडत आहेत. याच ज्येष्ठांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी
26 Feb 2023, 10:16 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह (Pune Bypoll Voting) पार पडत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कसब्यात 6.5% तर चिंचवडमध्ये 3.52% मतदानाची नोंद झाली आहे.
26 Feb 2023, 09:43 वाजता
Chinchwad Bypoll LIVE Updates : आताची सर्वात मोठी बातमी...चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर राडा झाला. भाजप नगरसवेक सागर आंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंमध्ये धक्काबुक्की झाली. पिंपळे गुरवमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.
26 Feb 2023, 09:36 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पुण्यात कसबा पेठ मतदारसंघातले (Pune Bypoll Voting) भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान केलं. बाजीराव रस्त्यावर नूतन मराठी विद्यालय या शाळेत रासने यांनी मतदान केलं.
26 Feb 2023, 09:19 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Pune Bypoll Voting) पोटनिवणूक मतदानासाठी पुणेकरांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केली आहे. या परिसरात आयटी कंपनी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्निंग वॉकच्या निमित्ताने आयटी क्षेत्रातील लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
26 Feb 2023, 09:13 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. दोन्हीही मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येतोय. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्याला खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रचारात शक्तिपणाला लावलीय. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांची लढत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याशी होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय.
Maharashtra | Voting begins for Kasba Peth Assembly constituency in Pune.
(Visuals from the polling booth number-75 of Nutan Marathi Vidyalaya) pic.twitter.com/IH1GevVIoP
— ANI (@ANI) February 26, 2023
26 Feb 2023, 08:42 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्यामुळे तिरंगी लढत होतेय. भाजप आणि मविआच्या उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवणार असा विश्वास कलाटेंनी व्यक्त केलाय. मतदानाला जाण्याआधी त्यांना कुटुंबीयांनी औक्षण केलं.
26 Feb 2023, 08:41 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. लक्ष्मण जगतापांच्या कामाला मतदार लक्षात ठेवून मतदान करतील असा विश्वास अश्विनी जगताप यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केला.