Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ (Pune Bypoll Voting) पोटनिवणूक मतदानासाठी पुणेकरांनी मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी केली आहे. दरम्यान चिंचवडमध्ये गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.
26 Feb 2023, 18:58 वाजता
चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला
चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याची चिन्ह आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीत पाच वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान झालंय. सहा वाजता मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत आहे.
26 Feb 2023, 17:35 वाजता
गिरीश बापट यांनीही बजावला मतदानाचा हक्क
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपा खासदार गिरीश बापट यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरले होते. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत होती.
26 Feb 2023, 15:46 वाजता
मतदानासाठी थेट अमेरिकेतून गाठलं चिंचवड
रविवारची सुट्टी असल्याने कर्तव्यदक्ष नागरिकांनी मतदानाला बाहेर पडावे अशी अपेक्षा आहे. पण तरीही काही जण हे कर्तव्य पार पाडत नाहीयेत. पण काही जण मात्र लोकशाही मूल्ये जपताना दिसत आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीत मतदानासाठी अमेरिकीतील कैलास टिळे आणि त्यांच्या पत्नीने मतदान केंद्र गाठलं आहे.
26 Feb 2023, 13:58 वाजता
Pune Bypolls LIVE : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत 18.5 टक्के मतदान झालंय. तर चिंचवड मतदारसंघात आतापर्यंत 20.68% मतदान झालंय.
26 Feb 2023, 13:05 वाजता
Pune Bypolls LIVE : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहेत. त्यांनी ट्वीट करुन मतदानासाठी घराबाहेर पडा असं म्हटलं आहे.
Dear Kasba and Chinchwad residents,
If you have already voted by now, it’s great !
But others, please do go and vote asap.
Your one vote is powerful enough to affect lakhs of lives.
Please take your family, friends, relatives, colleagues too for voting.#byelection2023 #Pune pic.twitter.com/bacZCf0ypI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2023
26 Feb 2023, 12:06 वाजता
Pune Bypolls LIVE : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांनी नारायण पेठेतील SNDT कन्या शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्यासह मुलगी आणि सून हे मतदानासाठी आले होते. यावेळी टिळक कुटुंबीय भावूक झाल्याच पाहायला मिळाल. मुक्ता टिळक सोबत नसताना पहिल्यांदाच मतदानासाठी आलो असल्याची भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. कसबा विधानसभा भारतीय जनता पक्षाचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
26 Feb 2023, 12:04 वाजता
Pune Bypolls LIVE : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर राज्यात पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
26 Feb 2023, 12:00 वाजता
Pune Bypolls LIVE : कसबा पेठे विधानसभा पोटनिवडणूकसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकसाठी 10.45 टक्के मतदान झालं आहे.
26 Feb 2023, 11:39 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी गोपनियतेचा भंग केलाय.. त्यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी भाजप नेते धनंजय जाधव यांनी केलीये.. तर लोकांनी पाठवलेला फोटो ट्विट केल्याचं सांगत त्यांनी धनंजय जाधव यांचे आरोप रूपाली पाटील-ठोंबरे यांनी फेटाळून लावला आहे.
26 Feb 2023, 11:30 वाजता
Kasba Chinchwad Bypoll LIVE Updates : आताची सर्वात महत्त्वाची बातमी...राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून गोपनीयतेचा भंग झाला आहे. मतदान केंद्रावर मतदान करताना त्यांनी ईव्हीएम मशीनचा फोटो काढला. एवढंच नाही तर त्यांनी हा फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. त्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांचावर कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.