अलिबाग : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याच्या पालक मंत्री अदिती तटकरे यांनी कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेत अखेर हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
सध्याच्या घडीला रायगडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ७ हजारांच्याही पलीकडे पोहोलचा आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाचा हा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
थो़डक्यात आता शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळं त्यांनी आढावा बैठक बोलावली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील नागरिकांनी स्वयंशिस्तिनं लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून अनेक परिसरांमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला. किंबहुना शासनाकडून या भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात यावी अशी मागणीही कैक स्थानिकांनी केली होती.