close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुख्यमंत्री प्रचारसभेत, 'अर्धनग्न आंदोलन' करणारा तरुण नजरकैदेत

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आलीय

Updated: Apr 26, 2019, 01:26 PM IST
मुख्यमंत्री प्रचारसभेत, 'अर्धनग्न आंदोलन' करणारा तरुण नजरकैदेत

नाशिक : लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर 'अर्धनग्न आंदोलन' करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याला येवला तालुका पोलिसांनी नजरकैद केलंय. 

येवल्याच्या नागरसूल भागातील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या त्याचे 'अर्धनग्न आंदोलन' सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही निवेदन सोपवलं होतं. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कृष्णा डोंगरे यांनी कुठलीही गडबड करू नये, म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 


कृष्णा डोंगरे नजरकैदेत

मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत, मात्र व्हिडिओ अल्बममध्ये दिसतात. त्यामुळेच आपल्याला त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी ५०० रुपये देण्यासाठी त्यांना भेटायचं होतं. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याची खोचक प्रतिक्रिया कृष्णा यानं दिलीय.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १०.३० वाजता श्रीरामपूर (शिर्डी), दुपारी १२.०० वाजता येवला (दिंडोरी) तर दुपारी १.४५ वाजता धुळ्यात सभा आयोजित करण्यात आल्यात. तर सायंकाळी ७.३० वाजता मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतही ते उपस्थित राहणार आहेत.