'पटोलेंना उमेदवारी म्हणजे सामाजिक सलोखा धोक्यात'

'नागपूर संघाचं मुख्यालय असूनही नागपुरात सामाजिक सलोखा आजवर कायम राहिलाय'

Updated: Mar 12, 2019, 09:50 AM IST
'पटोलेंना उमेदवारी म्हणजे सामाजिक सलोखा धोक्यात'  title=

नागपूर : नाना पटोले यांना नागपुरातून उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी अनेक दलित विचारवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी केलीय. त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधींना ई-मेल करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका, आरोपींच्या बचावासाठी केलेले प्रयत्न पाहता लोकसभा निवडणूक २०१९ साठी त्यांची नागपुरातून उमेदवारी दलित समाजाला दुखावणारी ठरेल. तसंच नागपूर संघाचं मुख्यालय असूनही नागपुरात सामाजिक सलोखा आजवर कायम राहिलाय. कधीच दलित आणि कुणबी समाजात तेढ निर्माण झालेली नाही. मात्र, नाना पटोले यांना उमेदवारी दिल्यास तो सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकेल, अशी शक्यता ई मेलमध्ये व्यक्त केलीय.

दरम्यान, आज काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची महाराष्ट्रातील पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत १२ उमेदवारांची नावं घोषित होण्याची शक्यता आहे. या यादीत कुणा-कुणाचा समावेश होण्याची चिन्ह आहेत, पाहुयात...

- नंदुरबार -  के सी पाडवी

- धुळे - रोहिदास पाटील

- रामटेक - मुकुल वासनिक

- हिंगोली - राजीव सातव

- नांदेड - अमिता चव्हाण

- सोलापूर - सुशीलकुमार शिंदे

- गडचिरोली - डॉ नामदेव उसेंडी

- वर्धा - चारुलता टोकस

- यवतमाळ - माणिकराव ठाकरे

- मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा

- मुंबई उत्तर मध्य - प्रिया दत्त

- दक्षिण-मध्य - एकनाथ गायकवाड / वर्षा गायकवाड