लोकसभा निवडणूक २०१९ : पुणे लोकसभा मतदारसंघातील 'रणसंग्राम'

पुणे लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Apr 3, 2019, 07:38 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : पुणे लोकसभा मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील एकत्र निवडणूक लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष देखील एकत्र निवडणूक लढवत आहेत. पुण्यातून भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे.

२०१४ च्या निवडणुकीचा निकाल

२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. 

 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

अनिल शिरोळे भाजप 569825
विश्वजीत कदम काँग्रेस 254056
दिपक पायगुडे मनसे 93502
सुभाष वारे आप 28657
इम्तियाज पिरजादे बसपा 14727