Maharashtra Lok Sabha Nikal 2024: महाराष्ट्राचे पहिले दोन कल हाती, सुप्रिया सुळे आघाडीवर

महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 Latest News in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्राचे पहिले कल हाती आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 08:47 AM IST
Maharashtra Lok Sabha Nikal 2024: महाराष्ट्राचे पहिले दोन कल हाती, सुप्रिया सुळे आघाडीवर title=

Maharashtra Lok Sabha Result 2024 in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्राचे पहिले कल हाती आले आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपा उमेदवार पियूष गोयल आघाडीवर आहेत. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. तसंच जालनामधून रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत. तसंच चंद्रपूरमधून सुधीर मुनंटीवार पिछाडीवर आहेत. यासह बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवरुन असून, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होऊ शकतात.

- दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर 
- दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर
- कोल्हापूरात शाहू महाराज आघाडीवर 
- कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर
- ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर