कोल्हापूर : आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. इतकंच नाही तर निवडणूक आणि निकाल ही फक्त औपचारिकता राहिली असून येणारा आठवडा खूप गाजणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात त्यांनी हे विधान केलंय. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे.
भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरु आहे. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. त्याचवेळी आणखी काही जण भाजपमध्ये दाखल होतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिलेत. राष्ट्रवादीचे मोठे नेते विजयसिंह मोहीते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र डॉ. सुजय विखे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या गोठात उत्साहाचे वातावरण आहे.