महिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक

 या आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 4, 2018, 09:50 PM IST
महिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक title=

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घ़डली आहे, एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवली आणि व्यावसायिकाला ४१ लाखांचा गंडा घातला. या आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिया खरेदीच्या नावाखाली गंडवलं

ब्रिटिनमधील आमच्या कंपनीसाठी औषधी बियांची गरज असते, त्यामुळे त्या बिया खरेदी करा आणि कंपनीला द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्तच जास्त पैसे देऊ, असा अशी माहिती या महिलेने व्यावसायिकाला दिली. 

सोशल मीडियातूनच संपर्क

तसेच बिया कुणाकडून खरेदी करुन कंपनीपर्यंत पोहोचवायच्या यासंदर्भात महिलेने व्यावसायिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माहिती दिली आणि संपर्क करून दिला.

बँक खात्यात ४१ लाख ६४ हजार रुपये जमा

व्यावसायिकानेही संबंधिताच्या बँक खात्यात ४१ लाख ६४ हजार रुपये जमा केले. मात्र अजूनही औषधी बिया मिळाल्या नाहीत. शिवाय, संबंधिताकडून प्रतिसादही मिळत नसल्याचे लक्षात आले आहे.

यानंतर मात्र व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दाखल केली, यात मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.