शहापूरच्या कॅनरा बॅंकेत मंकी टोपी घालून चोर, सीसीटीव्हीत कैद

शहापूर तालुक्यातील खर्डी गावातल्या कॅनरा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. 

Updated: Feb 4, 2018, 08:47 PM IST
 शहापूरच्या कॅनरा बॅंकेत मंकी टोपी घालून चोर, सीसीटीव्हीत कैद  title=

शहापूर : शहापूर तालुक्यातील खर्डी गावातल्या कॅनरा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. 

शौचालयाची खिडकी तोडली 

 शौचालयाची खिडकी तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. मात्र बँकेतील सायरन वाजल्याने चोरट्यांना तिथून पळ काढावा लागला.

चोरट्यांचा तपास

 मंकी टोपी घालून आलेल्या चोरट्यांचा बँकेतील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 

गुन्ह्याची नोंद 

बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी चोरट्यांचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.