भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?

वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 13, 2024, 10:34 AM IST
भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?  title=

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे.  वाशिमच्या शिरपूर जैन येथील अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरामध्ये पुन्हा एकदा दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये वाद झाला असून या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं आहे.

भगवान पार्श्वनाथच्या मुख्यमूर्तीजवळ श्वेतांबर पंथियांकडून ओटा बांधण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम दारू पिलेल्या कारागिरांकडून होत असल्याचा दिगंबर पंथियांकडून आरोप करण्यात आला आहे. कारागीर दारू पिलेले असल्यानं मूर्तीचे पावित्र्य भंग होतंय असं म्हणत त्यांनी या कारागिरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मीयाकडून हिंसात्मक कृत्य मंदिरात घडत आहे. 15 महिन्यापूर्वी 40 वर्षानंतर अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले. मात्र मंदिर उघड्यापासूनच जैन धर्मातील दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही समुदायात किरकोळ विषयावरून नियमित वाद-विवाद होत आहेत.

(हे पण वाचा जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?) 

जैन समुदायामध्ये दोन पंथ आहे. एक दिगंबर जैन आणि दुसरे श्वेतांबक जैन. या दोन्ही जैन समुदायामध्ये काय फरक आहे. 

दिगंबरा जैन भिक्षु नेहमी नग्न राहतात, तर श्वेतांबर जैन भिक्षु पांढरे कपडे घालतात.
दिगंबर जैन मानतात की, मोक्ष मिळविण्यासाठी नग्न राहणे आवश्यक आहे, तर श्वेतांबर जैन पूर्ण नग्नतेवर विश्वास ठेवत नाहीत.
दिगंबरा जैन आचार्य विशाखाच्या वंशाशी संबंधित आहेत, तर श्वेतांबर जैन आचार्य स्थुलभद्राच्या परंपरेचे पालन करतात.
दिगंबर जैन श्रावक शिकवणीनुसार एकांती जीवन जगतात, तर श्वेतांबर जैन सांप्रदायिक जीवन जगतात.
दिगंबरा जैन हे भगवान आदिनाथ यांना त्यांचे मुख्य देव मानतात, तर श्वेतांबर जैन हे भगवान आदिनाथ तसेच इतर अनेक तीर्थंकर देवांना महत्त्वाचे मानतात.
दिगंबरा जैन केवली आहार पाळत नाहीत, तर श्वेतांबर जैन केवली आहाराचे पालन करतात.