महंत नामदेव शास्त्री - पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा वाद !

महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

Updated: Aug 29, 2018, 08:07 PM IST
महंत नामदेव शास्त्री - पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा वाद !

नांदेड : वंजारी समाजाच्या आरक्षण मेळाव्यावरून भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. भगवानगडावर दरवर्षी होणारा दसरा मेळावा गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. 

महंत नामदेव शास्त्री - पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा वाद !

नामदेवशास्त्रींनी आक्षेप घेतल्यानं गेल्यावर्षी भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगावमध्ये पंकजा मुंडेंनी मेळावा घेऊन, आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाची बैठक भगवानगडावर घेणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र नामदेवशास्त्रींनी पाथर्डीच्या तहसीलदारांना पत्र लिहून या बैठकीला हरकत घेतलीय. 

कराड हे राजकीय हेतूनं मेळावा घेणार असून, त्यादिवशी भगवानबाबांच्या जयंतीचा कार्यक्रम असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रींनी व्यक्त केलीय... त्यांच्या या पत्रामुळं खळबळ उडाली असून, नामदेवशास्त्री विरूद्ध मुंडे असा वाद पुन्हा विकोपाला जाण्याची शक्यता आहे.