धनंजय मुंडेंकडे मोठी आघाडी

 संपूर्ण महाराष्ट्रातील.... 

Updated: Oct 24, 2019, 12:06 PM IST
धनंजय मुंडेंकडे मोठी आघाडी

मुंबई : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने कंबर कसली ती म्हणजे या निवडणुकीच्या प्रचारासाठी. सत्ताधारी भाजपाने केंद्रातील काही सुत्रांचा अवलंब घेतला. तर, विरोधी पक्षांनी स्थानिक पातळीवर जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांची मतं मिळवण्याता प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी विरोधी पक्षांची ही भूमिका यशस्वी झाल्याचंही पाहायला मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रातील काही तुल्यबळ राजकीय लढतींमध्ये सर्वाधिक रंग धरला तो म्हणजे परळी मतदार संघाने. 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

२८८ पैकी ४६ जागा देणाऱ्या मराठवाड्यातील परळी मतदार संघात एकाच कुटुंबातील दोन चेहरे, किंबहुना भावा- बहिणीच्या नात्याने राजकीय विरोध पत्करत एकमेकांना आव्हान दिलं. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपाच्या पंकजा मुंडे या नेतेमंडळींमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली. 

LIVE : निवडणुकीचं महाकव्हरेज, राज्यभरात मतमोजणीला सुरुवात 

धनंजय मुंडे यांनी प्रतिपक्षाच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे यांना निशाणा केलं,  भाजपावरही त्यांनी सडकून टीका केली. याच राजकीय घडामोडींना उधाण आलं ते म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुंडे विरुद्ध मुंडे या लढतीतील अनपेक्षित वळणामुळे. धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं म्हणत पंकजा मुंडे आणि त्याच्या समर्थकांनी निषेधही नोंदवला. पण, त्यानंतर पत्रकार परिषदेत सर्वांसमोर येत मुंडे यांनी स्वत:ची बाजू मांडली. ज्याचे परिणाम आणि धनंजय मुंडे यांच्या जनसंपर्काचे थेट परिणाम हे निकालांमध्ये पाहायला मिळाले. 

गुरुवारी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु असताना पोस्ट मतांनी सुरुवात केली असता सुरुवातीला पंकजा मुंडे यांच्या खात्यात आघाडी गेली. पण, कालांतराने मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जाऊ लागल्या तसतशी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे आघाडी गेली. पाच हजार, हजार आणि आता थेट २१ हजार मतांची आघाडी घेत भावा- बहिणीच्या या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांचं पारडं जड दिसत आहे.