छगन भुजबळांपेक्षा पत्नीची कमाई तिप्पट! 5 वर्षातील संपत्तीचा आकडा पाहाच

Chhagan Bhujbal Property: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 25, 2024, 08:56 AM IST
छगन भुजबळांपेक्षा पत्नीची कमाई तिप्पट! 5 वर्षातील संपत्तीचा आकडा पाहाच
छगन भुजबळ संपत्ती

Chhagan Bhujbal Property: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी येवला शहरातील संपर्क कार्यालयापासून विंचुर चौफुली-फत्तेपूर नाकामार्गे येवला तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपली माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. यातून त्यांच्या संपत्तीच्या माहितीचादेखील खुलासा झाला आहे. छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून येवला मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार मागच्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत केवळ 82 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 3.35 कोटी रुपयांनी वाढ झालीय. 

Add Zee News as a Preferred Source

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता 27.73 कोटी रुपयांची आहे. तसेच त्यांच्यावर 44 लाख रुपयांची कर्ज आहे. 

भुजबळांच्या पत्नीच्या नावे किती संपत्ती? 

मागच्या पाच वर्षात छगन भुजबळ यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत तिपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, भुजबळांच्या पती-पत्नीच्या नावे माजगाव, नाशिक मध्ये भुजबळ फार्म,भायखळा,वाशी तर अनेक ठिकाणी प्लॉट फ्लॅट, दिंडोरी मध्ये जमीन ट्रॅक्टर आहेत. 

संपत्तीत वाढ 

2004 मध्ये पत्नीच्या नावावर एक कोटी 91 लाखांची संपत्ती होती. छगन भुजबळांकडे त्यावेळी स्व मालकीचे एकही वाहन नव्हतं. केवळ पाच लाख रुपयांचे सोनं होतं.  2009 मध्ये त्यांची मालमत्ता सात कोटी 75 लाख होती. 2014 मध्ये भुजबळांच्या नावे आठ लाख तर पत्नीच्या नावी 24 लाखांचे कर्ज होते

समीर भुजबळ अपक्ष लढणार

समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे. अशा स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढण्याचा किंवा महाविकास आघाडीत प्रवेश कऱणं हे दोन पर्याय होते. दरम्यान महायुतीकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीर भुजबळांनी अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा पर्याय निवडला तर त्यांच्यासमोर सुहास कांदेंचं आव्हान असू शकतं. त्यामुळे समीर भुजबळ  यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. समीर भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, "साधारण वर्षभरापूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली होती. ही जबाबदारी पार पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण संघटन मजबुतीने उभे केले. यामध्ये जिल्हाध्यक्षापासून बूथपर्यंत संघटनेची बांधणी आपण केली".पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "मात्र भुजबळ कुटुंबीयांच्या ऋणानुबंध असलेल्या नांदगावमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातले वातावरण अतिशय दूषित झालेले असून येथील नागरिक भयभीत आहेत. नांदगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी आपली भेट घेऊन याबाबतली कैफियत आपल्यासमोर मांडली होती. नांदगावमधील नागरिकांची वाढत असलेली मागणी आणि नांदगावमधील दहशतीचं वातावरण बदलण्यासाठी या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. तो आपण स्विकारावा अशी विनंती".अजित पवारांनी दिल्या होत्या राजीनामा घेण्याच्या सूचना

समीर भुजबळ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रवेश कऱण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्य़क्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More