Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झालीये.विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झालाय.महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणाराय.यंदा महाविकास आघाडी, महायुतीसह अन्य आघाडीही आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहेत.त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे.महाराष्ट्राच्या महासंग्रामाला प्रारंभ झालाय.कारण विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय.लोकशाहीतल्या सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झालीय.महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे.
22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असेल.30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागेल. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला आहेत. 20 ते 29 वयोगटातील 1.85 कोटी मतदार आहेत. 20.93 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 85 वर्षांवरील 12.48 लाख मतदार आहेत, तर शंभरी ओलांडलेले 49 हजारांहून जास्त मतदार आहेत.. 6.32 लाख दिव्यांग तर 56 हजारांहून जास्त तृतीयपंथी मतदार आहेत... एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र राज्यभरात असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीतही संविधान हाच महाविकास आघाडीचा मुद्दा असेल.. आणि राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील असं भाकित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलंय.तर निवडणुकीची घोषणा होताच शंखनाद अशी पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनीही रणशिंग फुंकल्याची घोषणा केलीय.त्यानंतर काहीच वेळात त्यांनी 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या असं म्हणत दुसरी पोस्ट केली..
दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय.असं आवाहन फडणवीसांनी केलंय.
मात्र महायुतीसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आणि हरियाणा सारखी मुसंडी महाराष्ट्रात चालणार नाही. महाऱाष्ट्रात मुसंडी फक्त मराठ्यांची चालणार असून महाराष्ट्रात तुम्हाला लोळवणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिलाय.
आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्याने राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत असणार आहे. त्याशिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडी तसंच इतर छोटे पक्षही स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील.. मात्र महाराष्ट्राच्या रणसंग्रमात जनता कुणाला कौल देणार याचा महानिकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.