महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला काय?

MVA seats Distribution:  महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 15, 2024, 09:52 PM IST
महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्मुला काय?
मविआ जागावाटप

MVA seats Distribution: महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय,असा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. जागावाटपासंदर्भात मविआककडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मविआमध्ये कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याची माहिती समोर आलीय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालीय. महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं जागावाटप कसं होतं याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मविआचं हे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीतील जवळपास 85 टक्के जागावाटप निश्चित झालय. काही जागांबाबत मविआत अद्याप तिढा असला तरीही कोजागिरीच्या मुहूर्तावर  जागावाटपाची घोषणा होऊ शकते. 

Add Zee News as a Preferred Source

महविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार? 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शरद पवार गटानं आठ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अशातच आता महविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार? याची माहिती समोर आलीय.

जास्त स्ट्राईक रेट ठेवण्याचा पवारांचा गेम प्लान?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी 18 ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. तर स्वत: शरद पवार  त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करणार आहेत. मविआत सर्वात कमी म्हणजेच 88 जगांवर शरद पवार गटानं निवडणूक लढवण्याची तयारी दाखवलीय. कमी जागा लढवून जास्तीत जास्त स्ट्राईक रेट ठेवण्याचा पवारांचा गेम प्लान यशस्वी होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप 158 जागा लढणार असं सांगण्यात येतंय. तर शिवसेनेला 70 आणि राष्ट्रवादीला 60 जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. चर्चिला जाणारा फॉर्म्युला शिवसेना आणि राष्ट्रवादीला मान्य असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं यावेळीही जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीत भाजप मोठा भाऊ असला तरी भाजप नक्की किती जागा लढवणार याबाबत उत्सुकता आहे. विधानसभेला भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटपात भाजप 158, शिवसेना 70 तर राष्ट्रवादी 60 जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या दोन दिवसांत महायुतीचे घटकपक्ष बैठक घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करु असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलंय. यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं निरीक्षण अजित पवार गटाचं आहे. बंडोबांची संख्या वाढल्यास पाडापाडी होण्याची शक्यता आहे. महायुती उमेदवार जाहीर करताना बंडखोरी होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलंय. सध्या महायुतीचा जो फॉर्म्युला चर्चिला जातोय. तो फॉर्म्युला महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला मान्य असेल असं वाटत नाही. लोकसभेप्रमाणं जागावाटपाचं गुऱ्हाळ खूप दिवस सुरु राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More