'नवनीत राणा या आधुनिक झाशीची राणी!' अमरावतीच्या सभेत फडणवीसांकडून कौतुकाचे उद्गार

Devendra Fadanvis  On Navneet Rana: धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसूळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 10, 2024, 08:27 PM IST
'नवनीत राणा या आधुनिक झाशीची राणी!' अमरावतीच्या सभेत फडणवीसांकडून कौतुकाचे उद्गार title=
नवनीत राणा

Devendra Fadanvis  On Navneet Rana: धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसूळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली.  यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजना, समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे सांगत असतानाच त्यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

'आधुनिक झाशीची राणी'

'माझ्या आजोबांचं घरसुद्धा मेळघाटमध्ये होतं. नवनीत राणा येथील मुलगी आहे. मी देखील इथला मुलगा असल्याचे ते म्हणाले. मेळघाटमध्ये नवनीत राणा यांना तुम्ही लीड दिला. मी तुम्हाला रामराम करतो. पण आपल्यासोबत बेईमानी झाल्याचे ते म्हणाले. ज्यांनी रामाला आणलं त्यांना निवडून आणा. आम्ही आमचं काम केलंय. आता तुमची वेळ असल्याचे आवाहन त्यांनी अमरावतीकरांना केले. नवनीत राणा यांनी मेळघाटसाठी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार नवनीत राणा यांचा आधुनिक झाशीची राणी म्हणून उल्लेख केला. 

समृद्धी महामार्गाला अनेकांचा विरोध होता मात्र समृद्धी महामार्गांमुळे शेतकऱ्यांचा विकासाला चालना मिळाली..जे लोक म्हणायचे समृद्धी महामार्ग होत नाही मात्र आलो तो महामार्ग करून दाखवला.आता विदर्भाला दुष्काळमुक्त करून दाखवायचा आहे. वैनगंगा नदीजोड प्रकल्प हा अनोखा प्रकल्प राहील. 550 किलोमीटर ची गोसिकुर्द नदी बुलढाणा पर्यंत जोडली जाणार आहे.नदीजोड प्रकल्प पूर्ण करून कायम दुष्काळ संपवणार आहोत व शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळणार असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार

आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना 8000 कोटी पिक विम्याचे म्हणाले..आता आमचं सरकार आल्यास पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत.शेतकऱ्यांचा कृषी पंपाचा वीज बिल आम्ही माफ केल... पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाही आम्ही निर्णय केल्याचे ते म्हणाले.  यापुढे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल रात्रीचा शेतात जाव लागणार नसल्याचेही ते म्हणाले.मागच्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले, या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत  केली.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल विकला गेला तर भावांतर योजनेअंतर्गत तो फरक शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाही शेतकऱ्याला हमीभावापेक्षा कमी भाव मिळू देणार नाही.राज्यात सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

आम्ही तुमचे सख्खा भाऊ

2028 पर्यंत एक कोटी लखपती दिदी बनविण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. उच्च शिक्षणात मोठा खर्च येतो.. मात्र आता मुलींची फी भरून मोफत शिक्षण दिले जाणार आहे. मुलींचे मामा मंत्रालयात बसलेले आहेत. त्यामुळे आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये त्यांना देतो.आम्ही तुमचे सख्खा भाऊ आहोत मात्र काँग्रेसचे सावत्र भाऊ हे बाहेर फिरत आहेत.नाना पटोले आणि काँग्रेसची काही मंडळी कोर्टात जाऊन  ही योजना बंद करावी यासाठी गेले होते.आता आमचे सरकार आल्यास पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

धामणगाव रेल्वे मतदारसंघात विपश्यना केंद्राची स्थापना करू,निवडणुकीच्या आधी घेतलेले निर्णय लागू करू असे ते म्हणाले.  विरोधक यावर आक्षेप घेतात, मात्र मी जे बोलतो ते मी करुन दाखवतो. मग मी माझंपण नाही ऐकत, असे म्हणत त्यांनी सिनेमातील डायलॉग बोलून दाखवला. फडणवीस भाषण करत असतानाच प्रेक्षकांमधून एकाने 'आय लव यू' म्हटले. फडणवीस यांनी देखील त्या कार्यकर्त्याला लव यू टु म्हणत  उत्तर दिले आणि भाषण सुरु ठेवले.