Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Updated: Feb 28, 2023, 12:03 PM IST
Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला title=

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. याचे पडसाद आज विधानभवानात पाहायला मिळालेत. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदारही कांदाप्रश्नी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बजेट अधिवेशानात विरोधकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलन केले. तर चक्क दाराला कांद्याची माळ लटकविण्यात आली. (Budget Session 2023)

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी तसंच निर्यातबंदी उठवावी, अशी आक्रमक मागणी विरोधकांनी केली. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेत्यांनी अजित पवारांनी इतर सर्व मुद्दे बाजूला ठेऊन कांदा प्रश्नावर चर्चा सुरू करण्याची मागणी केली. विरोधकांच्या मागणीवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नाफेडद्वारे खरेदी सुरू केल्याचं, तसंच निर्यातबंदी नसल्याचं म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न पेटत आहे. अनेक भागात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी अधिक आक्रमक पाहायला मिळत आहेत. काल लासलगावी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले. कांदा भावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आता कांद्याचा मुद्दा विधानभवनात उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या आंदोलन केले.

विधानसभा परिसरात  राष्ट्रवादीच्या आमदारांनी डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेत आंदोलन केले. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यत आंदोलन सुरु राहिले, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त... शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो... कांद्याला भाव मिळालाच पाहिजे... कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.