दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देशातील बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) शिथिल करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) अजूनही काही अपवाद वगळता काही निर्बंध हे कायम आहेतच. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे प्रवास (Mumbai Suburban Railway) , मंदिरं (Temples In Maharashtra) हे बंदच आहेत. रेल्वे लोकल विना सर्वसामन्यांचे हाल होतायेत. त्यामुळे लोकल सुरु करण्यासोबतच सर्व निर्बंधांमधून मुक्त करावं, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रात्री जनतेशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferncing) संवाद साधणार आहेत. रात्री 8 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे निर्बंधातून पूर्णपणे सूट देणार की फक्त काही अंशी दिलासा देणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. (maharashtra chief minister uddhav thackeray will addresing people today 8 august 2021 over to corona restriction and local railway travel)
या निर्णयांकडे असणार लक्ष
- राज्यातील लसीकरण
- लोकलमध्ये दोन डोस दिलेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी होणारी मागणी
- राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याबाबत होणारी मागणी
-पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळालेली नाही, तिथे व्यापारी आंदोलन करतायत
- गणेशोत्सव आणि धार्मिक सण येतातच त्यासाठी राज्य सरकारची भूमिका
- गणेशोत्सवावर निर्बंध लावू नयेत अशी भाजप मागणी करतंय, हिंदूंच्या सणांना निर्बंध नको अशी भाजपकडून मागणी होतंय त्यावर मुख्यमंत्री भाष्य करण्याची शक्यता