महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, 2 मेपर्यंत ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 11लाखांच्या घरात?

 2 मेपर्यंत राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 लाखांच्या घरात

Updated: Apr 22, 2021, 11:46 AM IST
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, 2 मेपर्यंत ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 11लाखांच्या घरात? title=

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या याच वेगानं वाढत राहिल्यास 2 मेपर्यंत राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 लाखांच्या घरात जाईल असा अंदाज गेल्या पंधरवड्यातील आकडेवारीवरुन वर्तवण्यात आलाय. ही रुग्णवाढ थांबवायची असेल तर आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं आरोग्य विभागानं राज्य मंत्रीमंडळाला सांगीतलंय. 

राज्यभरातील रुग्णसंख्या 

आज राज्यात ६७,४६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 568 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.54% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,46,14,480 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,27,727 (16.36टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,15,292 क्वारांटाईनमध्ये आहेत. तर 28,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहे.

मुंबईत आज 7684 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 6790 रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. मृत झालेल्या रूग्णांपैकी 40 रूग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. 33 रुग्ण पुरूष व 29 रूग्ण महिला होते. तर 3 रूग्णांचे वय 40 वर्षां खाली होते. 38 रूग्णांचे वय 60 वर्षांवर होते. उर्वरीत 21 रूग्ण 40 ते 60 वयोगटामधील होते.