नाही म्हणाली अन् आयुष्यच गमावून बसली... काही सेकंदातच तिची स्वप्न विखुरली!

श्वेता हिची प्रतीक याच्यासोबत 2018 मध्ये नातेवाईकांच्या लग्नामध्ये ओळख झाली होती. 

Updated: Nov 10, 2022, 10:10 AM IST
नाही म्हणाली अन् आयुष्यच गमावून बसली... काही सेकंदातच तिची स्वप्न विखुरली!  title=
man brutally stabbed to death of a highly educated girl

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: हल्ली समाजात फारच धक्कादायक प्रकार (Crime News) हे घडत असतात. त्यामुळे कायमच सतर्क असणे आवश्यक आहे. सध्या पुण्यासारख्या भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे जो ऐकून तुम्हालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही. लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी औंध येथे घडली. श्वेता विजय रानवडे (वय 26, रा. सिद्धार्थ नगर औंध पुणे) या तरुणीचा (Maharashtara  Crime news) या दुर्दैवी घटनेत खून झाला असून या प्रकरणी प्रतीक किसन ढमाले (वय 27, रा. कडूस, राजगुरुनगर पुणे) यांच्याविरुद्ध चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra Crime News man Brutally stabbed to death of a highly educated girl who refused to marry marathi crime news)

श्वेता हिची प्रतीक याच्यासोबत 2018 मध्ये नातेवाईकांच्या लग्नामध्ये ओळख झाली होती. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांनंतर प्रतीक याने श्वेता हिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला फोन वरून धमकवणे तसेच इतर मानसिक छळ सुरू केला होता. त्यामुळे श्वेताने त्याला लग्नास नकार दिला होता. ही बाब तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितलेली होती. मात्र प्रतीक आत्महत्येची धमकी देऊन तिला आणखी त्रास देत होता. दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी तिने चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे एक वर कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज देखील दाखल केला होता.

काय घडला नक्की प्रकार : 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्वेता तिची आई दिपाली यांच्यासोबत दुचाकीवरून घरी आल्यानंतर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या प्रतीक याने तिच्या मानेवर छातीवर व पोटावर चाकूने वार केले. हा प्राणघात हल्ला करून प्रतीक तिथून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

पोलिस कारवाई सुरू : 

श्वेता ही सीएचा (CA) अभ्यास करत होती. काही दिवसांपूर्वी ती उच्च शिक्षणासाठी परदेशातही गेलेली होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे. घरी आई व भाऊ याच्यासोबत ती राहत होती. सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिला पुन्हा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची तिची इच्छा होती. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रतीक ने तिचा त्यापूर्वीच दुर्दैवी अंत केला. श्वेताच्या या निर्घृण खूनाच्या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांसह नातेवाईक व परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यापूर्वी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जावरून प्रतिक वर कायदेशीर कारवाई झाली असती तर कदाचित आज श्वेताचा जीव बचावला असता. या गंभीर घटनेसाठी जबाबदार दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी श्वेताच्या कुटुंबीयांनी केली आहे.