मुंबई : राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लगावले आहेत. येत्या काही महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव (Ganpati Festival 2021) साजरा केला जातो. या निमित्ताने नातेवाईकांच्या घरी येणं जाणं होतं. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गृह विभागाकडून (Ministry of Home Affairs Department) या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मागील वर्षात नियमावळी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागणार आहे. (maharashtra government announces rules for Ganeshotsav 2021)
काय आहे नियमावली?
गृह विभागाच्या सूचनेनुसार, सरकारने गणेश मूर्तीची उंची जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फूट तर सार्वजनिक मंडळासाठी 4 फूटांच्या मूर्तीची परवानगी असणार आहे.
- गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
- कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
- विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
- नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
- शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
- सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
- आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
- नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
- गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
संबंधित बातम्या :
राज्यात 'या' जिल्ह्यात 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण
'व्यापारी म्हणतात, कोरोनासे नही साहब, लॉकडाऊन से डर लगता है!'